Mumbai Indians vs Gujarat Titans IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात जीटीचा कर्णधार शुभमन दिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत, मुंबईकडून रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी आले. पण, गुजरातच्या विजयाचा पाया रचण्याआधीच संघाच्या तीन खेळाडूंकडून गचाळ फिल्डिंग पाहायला मिळाली. मुंबईच्या स्फोटक फलंदाजांना सलग दोन जीवदान देण्यात आले, त्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा संयम सुटल्याच पहायला मिळालं.

गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली, पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने 2 धावांवर रायन रिकेल्टनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर अर्शद खानने रोहित शर्माला आपल्या जाळ्यात अडकवले. पण गुजरातला ही सुरुवात आणखी चांगली करता झाली असती आणि मुंबईचे कंबरडे मोडण्याची संधी त्यांच्याकडे होती, पण खराब क्षेत्ररक्षणामुळे ते हुकले. त्यामुळे ब्रेक दरम्यान आशिष नेहरा संघावर रागावलेला दिसत होता.

विल जॅक्सने सोडले दोन कॅच...

पॉवर प्लेमध्ये गुजरातकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. विल जॅक्सने दोन सोपे झेल चुकवले, पहिला झेल साई किशोरने सोडला आणि दुसरा झेल मोहम्मद सिराजने सोडला. यानंतर, विल जॅक्सने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि मुंबईला पुन्हा ट्रॅकवर आणले. त्यात साई सुदर्शनने सूर्यकुमार यादवचा एक झेल सोडला. पण, सुदर्शननेच सूर्यकुमारला त्याच्या फिरकीत अडकवले. दोन्ही फलंदाजांमध्ये एक शानदार भागीदारी दिसून आली. सूर्याने 35 धावा केल्या तर जॅकने धमाकेदार अर्धशतक झळकावले.

मुंबईचे सलामीवीर ठरले अपयशी....

मुंबई संघाचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. रोहित शर्मा अलिकडेच उत्तम फॉर्ममध्ये होता, पण या सामन्यात हिटमॅनची बॅट चालली नाही. त्याच वेळी, गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या रायन रिकेल्टननेही फक्त 2 धावांवर आपली विकेट गमावली. पण, सूर्या आणि जॅक्सने त्यांच्या शानदार खेळीने संघाला पुनरागमन मिळवून दिले आहे.

हे ही वाचा -

Gautam Gambhir : 2011 च्या वर्ल्डकपचं श्रेय मिळालं नाही याचं दु:ख वाटतं का? गौतम गंभीरचं मनं जिंकणार उत्तर