GT vs LSG Playing 11 : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 51 व्या सामन्यात आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) सामना लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यासोबत होणार आहे. अमहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 7 मे रोजी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. कृणाल पांड्याच्या नेतृत्त्वात लखनौ संघ तर, हार्दिक पांड्याच्या गुजरात संघ एकमेकांसमोर रणांगणात उतरणार आहेत. गुजरात टायटन्सने मागील सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. त्याउलट लखनौ सुपर जायंट्स संघाचा चेन्नईसोबतचा मागील सामना अनिर्णित राहिला.
IPL 2023, GT vs LSG : गुजरात विरुद्ध लखनौ
गुजरात टायटन्स संघाने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर (RR) शानदार विजय मिळवला आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचा मागील सामना पावसामुळे रद्द झाला होता. दोन महत्त्वाचे गुण मिळवण्यासाठी दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान आयपीएल 2023 गुजरात संघाचं पारड जड आहे. हे दोन्ही संघ यंदाच्या मोसमात आमने-सामने आले होते. यावेळी गुजरातने लखनौ संघाचा पराभव केला होता. आज लखनौला गुजरात विरुद्धचा पहिला विजय मिळणार का हे पाहावं लागणार आहे.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.
GT vs LSG Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
GT Probable Playing 11 : गुजरात संभाव्य प्लेईंग 11
वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ.
LSG Probable Playing 11 : लखनौ संभाव्य प्लेईंग 11
काइल मेयर्स, मनन वोहरा, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान