Gautam Gambhir's Tweet: लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीर याच्या ट्वीटने सोशल मीडियात खळबळ माजवली आहे. आरसीबीच्या विराट कोहलीबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर गौतम गंभीर याने केलेले हे ट्वीट चर्चेचा विषय आहे. एका न्यूज चॅनलच्या अंकरने विराट कोहली याची बाजू घेत गौतम गंभीर याच्यावर निशाणा साधला होता. प्राइम टाइममध्ये त्यांनी गौतम गंभीर याच्यावर गंभीर टीका केली होती. यावरुनच गौतम गंभीर याने ट्वीट करत निशाणा साधला आहे. यामध्ये गौतम गंभीर याने त्या अँकरचे कुठेही नाव घेतले नाही. पण सोशल मीडियावर लोकांनी तो व्हिडीओ पोस्ट केला आहे. गौतम गंभीर याच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
गौतम गंभीर याने आपल्या ट्वीटमध्ये कुणाचेही नाव घेतले नाही. पण जो मजकूर लिहालाय त्यावरन क्रिकेट चाहत्यांना गंभीरला काय आणि कुणाला म्हणायचे याचा अंदाज लावला आहे. गौतम गंभीर याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, ' दबाव असल्याचे सांगत ज्या व्यक्तीने दिल्ली क्रिकेट सोडून पळ काढला, आता तोच व्यक्ती क्रिकेटबाबत पैसे घेऊन चिंता व्यक्त करत आहे. हाच कलयुग आहे.. जेथे पळपुटे आपली अदालत चालवत आहे'
गौतम गंभीरचे ट्वीट जसेच्या तसे -
Man who ran away from Delhi Cricket citing “pressure” seems over eager to sell paid PR as concern for cricket! यही कलयुग़ है जहां ‘भगोड़े’ अपनी ‘अदालत’ चलाते हैं।
गौतम गंभीर याच्या ट्वीटनंतर क्रिकेट चाहत्यांनी इंडिया टिव्हीचे अँकर रजत शर्मा यांचा व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरु केला. त्यामध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या वादावर रजत शर्मा यांनी आपले मत व्यक्त केलेय. यामध्ये रजत शर्मा यांनी गौतम गंभीर याचा अंहंकार वाढल्याचे म्हटलेय. रजत शर्मा म्हणाले की, विराट कोहलीची वाढती लोकप्रियता गौतम गंभीर याला त्रास होतोय. निवडणूक जिंकल्यानंतर गौतम गंभीर याचा अहंकार आणखी वाढलाय. विराट कोहली नेहमीच आक्रमक राहतो.. मैदानावर झालेल्या चुकीच्या गोष्टीला विराट कोहली उत्तर देतो. त्यामुळेच विराट कोहलीने गौतम गंभीर याला उत्तर दिले. पण एकूणच गौतम गंभीर याने केलेले वर्तन एका खासदाराला आणि माजी क्रिकेटपटूला शोभा देत नाही. यामुळे क्रिकेटचे नुकसान होते.
रजत शर्मा इंडिया टीव्हीवर 'आपकी अदालत' नावाचा शो मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. ते दिल्ली क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत. दीड वर्षानंतर रजत शऱ्मा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.