Michael Vaughan On Dinesh Karthik : आरसीबीचा विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकने यंदा धावांचा पाऊस पाडलाय. कार्तिकने आरसीबीसाठी फिनिशिरची भूमिका योग्यरित्या पार पाडली आहे. कार्तिकने आपल्या विस्फोटक खेळीने भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा एकदा ठोठावले आहेत. आयपीएलमधील कार्तिकच्या कामगिरीनंतर त्याला भारतीय संघात स्थान द्यावे, अशी मागणी क्रीडा चाहत्यांसोबत अनेक माजी क्रिकेटपटू करत आहेत. यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांचाही समावेश झालाय. 


इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकल वॉन याने दिनेश कार्तिकला टी 20 विश्वचषकामध्ये संघात स्थान द्यावेच लागेल... असा मत मांडलेय. या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक रंगणार आहे. धोनीनंतर भारतीय संघाला विश्वासू फिनिशर मिळाला नाही. सातव्या आणि आठव्या क्रमांकावर झटपट धावा काढणारा फिनिशर भारताकडे नाही... त्यामुळे 36 वर्षीय दिनेश कार्तिकच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना अनेक माजी खेळाडूंनी दिली आहे. 


रविवारी आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात दिनेश कार्तिकने विस्फोटक खेळी केली. कार्तिकने अवघ्या आठ चेंडूत नाबाद 30 धावा चोपल्या. या खेळीनंतर मायकल वॉन याने ट्वीट करत कार्तिकला टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान द्यावे लागले, असे सांगितले. 


पाहा वॉनचे ट्वीट-  


  






दिनेश कार्तिकची कामगिरी -  
यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिकची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. कार्तिकने आतापर्यंत 11 सामन्यात 61 च्या सरासरीने आणि 189 च्या स्ट्राईक रेटने 244 धावा चोपल्या आहेत. यामध्ये तो तब्बल सातवेळा नाबाद राहिलाय. नाबाद 66 ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. यंदाच्या हंगामात कार्तिकने एकूण 129 चेंडूचा सामना केला आहे. यामध्ये त्याने 17 षटकार आणि 20 चौकार लगावले आहेत. कार्तिकने 182 धावा फक्त चौकार आणि षटकारांनी चोपल्या आहेत.


हे देखील वाचा-