IPL 2022 : दिल्लीचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नर अनेकदा बॉलिवूड तसेच टॉलिवूड गाण्यांवर त्याच्या लिप-सिंक आणि डान्स व्हिडिओसह त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो. वार्नर सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तो अनेक व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांचं मनोरजंन करत असतो. वॉर्नरच्या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप प्रतिसाद मिळतो. असाच वॉर्नरने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वॉर्नरने केजीएफ चॅप्टर 2 मधील रॉकी भाईच्या स्टाईलमधील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये वॉर्नर रॉकी भाईचा डायलॉग बोलताना दिसत आहे. 
 
या नव्या व्हिडिओत वॉर्नर KGF मधील प्रसिद्ध डायलॉग Violence..Violence..Violence!. I don’t like it. I Avoid..But…Violence likes me, Can't Avoid बोलताना दिसतोय. वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. 


पाहा व्हिडिओ...... 






कोलकाता विरोधात झालेल्या सामन्यात डेविड वार्नरने शानदार अर्धशतक झळकावलं.  या अर्धशतकासह वॉर्नरने अनेक विक्रमाला गवसणी घातली. वॉर्नरने 52 वे अर्धशतक केले. शिवाय आयपीएलमध्ये 5500 धावांचा टप्पाही पार करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला. वॉर्नरने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. वॉर्नरने 55 वेळा 50 पेक्षा जास्त धावा चोपल्यात.  वॉर्नरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 51 अर्धशतक आणि चार शतकं झळकावली आहेत. 


आयपीएलमध्ये शनिवारी डबल धमाका
आयपीएलमध्ये शनिवारी दोन सामने होणार आहेत. दुपारी मुंबईचा सामना लखनौविरोधात होणार आहे. तर रात्री दिल्ली आरसीबीबरोबर दोन हात करणार आहे. मुंबईला सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. शनिवारी मुंबई लखनौविरोधात विजय मिळवत आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. तर दिल्ली आणि आरसीबीमध्ये रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि लखनौ यांच्यातील सामना ब्रेबॉन स्टेडिअमवर होणार आहे. तर आरसीबी आणि दिल्ली वानखेडे स्टेडिअमवर दोन हात करणार आहेत.