एक्स्प्लोर

CSK Playing XI IPL 2026 : CSKच्या प्लेइंग-11 कॉम्बिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट, MS धोनीला नाकारलं, 12 जणांतही स्थान नाही, चाहत्यांमध्ये खळबळ

CSK Playing XI IPL 2026 : सीएसकेसाठीच्या सर्वोत्तम 12 खेळाडूंच्या निवडीमध्ये, संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे यांना सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आले आहे.

CSK Playing XI IPL 2026 : आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सबद्दल (Chennai Super Kings) एक मोठे विधान समोर आले आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) सीएसकेसाठी आपल्या पसंतीच्या संघाची निवड केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने 12 सदस्यीय संघात महेंद्रसिंग धोनीचा समावेश केलेला नाही. या सूचनेमुळे चाहत्यांमध्ये एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

इरफान पठाणच्या मते, धोनीची भूमिका आता मैदानावर कमी आणि संघात मार्गदर्शक म्हणून अधिक असू शकते. त्याच्या मते, गेल्या काही हंगामांमध्ये धोनी बहुतेक वेळा शेवटच्या एक-दोन षटकांत फलंदाजीसाठी आला आहे. यामुळे चाहत्यांना निश्चितच एक रोमांचक अनुभव मिळतो, परंतु प्रत्येक सामन्यात संघाच्या रणनीतीमध्ये हे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाऊ शकत नाही.

धोनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसू शकतो

पठाणच्या मते, 44 वर्षीय धोनीने आता सीएसके संघ मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तो म्हणतो की, सीएसकेकडे आता युवा, भविष्यातील नेते आहेत ज्यांना घडवण्याची गरज आहे. या संदर्भात, त्याने नुकतेच संघात सामील झालेल्या ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनसारख्या खेळाडूंनाही महत्त्वाचे मानले.

इरफानच्या मते, जर धोनी प्रत्येक सामन्यात खेळला, तर इतर खेळाडूंना संघात स्थान मिळवणे कठीण होते. त्याने विशेषतः सरफराज खानचा उल्लेख करत म्हटले की, तो सहाव्या क्रमांकावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे, संघाने भविष्याचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत.

इरफान पठाणचा सीएसकेसाठी सर्वोत्तम संघ

इरफान पठाणच्या सीएसकेसाठीच्या सर्वोत्तम 12 खेळाडूंच्या निवडीमध्ये, संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे यांना सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आले आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर आहे. मधल्या फळीत शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेविस आहेत. सरफराज खान सहाव्या क्रमांकावर आहे, तर कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. गोलंदाजी विभागात अकील हुसेन, नूर अहमद आणि मॅट हेन्री यांचा समावेश आहे. खलील अहमदची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड झाली आहे.

इरफान पठाणने निवडली चेन्नई संघाची टीम - संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकील हुसेन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद (इम्पॅक्ट प्लेयर).

हे ही वाचा -

IPL 2026 Update News : टूर्नामेंट सुरू होण्याआधीच गेम ओव्हर; 7 खेळाडू OUT, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वाढवली चिंता, कोण भरणार पोकळी?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
Embed widget