Kamindu Mendis Catch of the Tournament IPL : आयपीएल 2025 स्पर्धेत चाहते 'कॅच ऑफ द टूर्नामेंट'ची वाट पाहत होते आणि सनरायझर्स हैदराबादच्या कामिंदू मेंडिसने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर एक आश्चर्यकारक, अशक्य असा झेल घेऊन सर्वांना चकित केले. त्याने सीएसकेचा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसचा हवेत उडी घेत एका हाताने भन्नाट झेल घेतला. संघाची मालकीण काव्या मारन आणि कर्णधार पॅट कमिन्सलाही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. 

सामन्यातील 14 वे षटक सुरू असताना सीएसकेचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने हर्षल पटेलच्या चेंडूवर एक आक्रमक शॉट मारला. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने वेगाने जात होता आणि तो षटकार असेल असे वाटत होते. पण मग मेंडिसने हवेत उडी मारली जणू तो सुपरमॅन आहे. त्याने डावा हात पुढे केला आणि चेंडू हातात आला.

सीएसकेचा पदार्पण करणारा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis Debut CSK) वादळी पद्धतीने फलंदाजी करत होता. पण मेंडिसने घेतलेल्या एका शानदार झेलमुळे तो 42 धावांवर बाद झाला. कामिंदू मेंडिसचा हा झेल इतका अद्भुत होता की सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सलाही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याचे तोंड उघडे राहिले आणि तो मेंडिसकडे पाहत राहिला. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही या अद्भुत झेलचे कौतुक केले. सामन्यादरम्यान समालोचन करताना रवी शास्त्री यांनी याला 'कॅच ऑफ द टूर्नामेंट' म्हटले.

कामिंदू मेंडिस म्हणजे आठवे आश्चर्य!

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कामिंदू मेंडिस हा जगातील आठव्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्याशी केला, हा विक्रम त्याने 13 डावांमध्ये साध्य केला. मेंडिसला गोलंदाजीही करता येते, इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो. एसआरएचने त्याला मेगा लिलावात 75 लाख रुपयांना खरेदी केले होते.

हे ही वाचा -

Virender Sehwag on Vaibhav Suryavanshi : षटकार ठोकून आयपीएलमध्ये पदार्पण! ...तरी 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कारकीर्द एका वर्षात संपणार? वीरेंद्र सेहवाग असे का म्हणाला?