Rohit Sharma Dance Video : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधतो. त्याच्या फलंदाजीचे जगभरात चाहते आहे. रोहित शर्माच्या सोशल मीडियावरील पोस्ट अल्पावधीतच व्हायरल होतात. असाच रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. रोहित शर्माने स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये रोहित शर्मा डान्स करताना दिसत आहे. मेहुण्याच्या लग्नात रोहित शर्मा पत्नी आणि मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. यावर शेकडो नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
24 मार्च रोजी रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत होता. पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा शर्मा यांच्यासोबत रोहित शर्माने क्वालिटी टाइम घालवला. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर मेहुण्याच्या लग्नाच्या तयारीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला रोहित शर्मा अनुपस्थित होता. रोहित शर्माच्या या व्हिडीओवर मुंबई इंडियन्स संघाने कमेंट केली आहे. त्याशिवाय इतर खेळाडूंनीही यावर कमेंट केली आहे. अक्षय कुमारच्या गुड न्यूज या चित्रपटातील गाण्यावर रोहित शर्मा डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तीन मिलियनपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे.
पाहा रोहित शर्माने पोस्ट केलेला व्हिडीओ
31 मार्चपासून आयपीएलचा रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा मुंबईचे नेतृत्व करत आहे. गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली होती. यंदा रोहितच्या नेतृत्वात मुंबईचा संघ विजेतेपदाला गवसणी घालण्याच्या इराद्याने मैदानात उरले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर वेगवान गोंलदाजीची धुरा सांभाळणार आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा मजबूती देतील. त्याशिवाय अष्टपैलू खेळाडूंचा भरणार आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबईची (MI) कामगिरी अत्यंत खराब झाली होती. संघाने एकूण 14 सामने खेळताना केवळ 4 जिंकले होते. त्यांना 10 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाचा या स्पर्धेतील याआधीचा रेकॉर्ड चांगला आहे. पण शेवटचा हंगाम अगदीच खराब होता. मात्र, यावेळी मुंबई संघात काही बदल करुन नक्कीच मैदानात उतरणार आहे.