Best Catch Of IPL 2025: श्रीलंकेचा खेळाडू 'कॅच ऑफ द सीझन'चा पुरस्कार घेऊन गेला; कसा पकडला होता झेल?, पाहा VIDEO
Best Catch Of IPL 2025: सामना संपल्यानंतर आयपीएल 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाला आणि खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Best Catch Of IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (Punjab Kings Vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 6 धावांनी विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपद जिंकले. आरसीबीने ट्रॉफी जिंकताच विराट कोहली (Virat Kohli) भावूक झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, सामना संपल्यानंतर आयपीएल 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाला आणि खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आयपीएल 2025 च्या हंगामातील 'कॅच ऑफ द सीझन'चा पुरस्कार श्रीलंकेचा आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या कामिंदू मेंडिसला देण्यात आला. ट्रॉफी आणि 10 लाख रुपये देऊन कामिंदू मेंडिसचा गौरव करण्यात आला. कामिंदू मेंडिसने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात झेप घेत अतिशय उत्कृष्ट झेल घेतला होता. कामिंदू मेंडिसचा हाच झेल आयपीएल 2025 कॅच ऑफ द सीझन ठरला.
कामिंदू मेंडिसने पकडला होता 'सुपर झेल', VIDEO:
Only a catch like that could’ve stopped that cameo from Brevis! 🤯
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
Kamindu Mendis, take a bow 🙇#CSK 119/6 after 14 overs.
Updates ▶ https://t.co/26D3UalRQi#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/NvthsQfpUj
आयपीएल 2025 च्या पुरस्कारांची संपूर्ण यादी
विजेता संघ - आरसीबी 20 कोटी
उपविजेता - पंजाब किंग्ज संघ 12.5 कोटी
तिसऱ्या स्थानी राहिलेला संघ- मुंबई इंडियन् 7 कोटी
चौथ्या स्थानी राहिलेला संघ – गुजरात टायटन्स 6 कोटी
अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच – जितेश शर्मा 1 लाख
अंतिम फेरीतील सामनावीर - कृणाल पांड्या 5 लाख रुपये
उदयोन्मुख खेळाडू - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट्स) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅप
ऑरेंज कॅप - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स, 759 धावा) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅप
फँटसी किंग ऑफ द सीझन - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर(एमव्हीपी) - सूर्यकुमार यादव 15 लाख रुपये आणि ट्रॉफी
फेअरप्ले पुरस्कार - चेन्नई सुपर किंग्ज 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
सुपर सिक्स ऑफ द सीझन - निकोलस पूरन (40 षटकार) 10 लाख
ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन - मोहम्मद सिराज 10 लाख
कॅच ऑफ द सीझन - कामिंदू मेंडिस 10 लाख
सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - 10 लाख
फोर ऑफ द सीझन साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) 10 लाख
खेळपट्टी आणि मैदान - दिल्ली कॅपिटल्स होम ग्राउंड 50 लाख
अंतिम सामना कसा राहिला?
पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 190 धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्स संघाकडून शशांक सिंगने नाबाद 61 धावांची खेळी केली. तर जोस इंग्लिशने 39 धावांची खेळी केली, पंजाब किंग्ज संघाला 184 धावा करता आल्या. हा संघ विजयापासून आणि आपल्या पहिल्या ट्रॉफीपासून 6 धावा दूर राहिला.





















