(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB vs CSK: आरसीबीसाठी डोकेदुखी ठरलाय रवींद्र जाडेजा, पाहा हैराण करणारी आकडेवारी
RCB vs CSK: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2022 च्या 49 वा सामना खेळला जाणार आहे.
RCB vs CSK: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2022 च्या 49 वा सामना खेळला जाणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. चेन्नईला 9 सामन्यापैकी केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आलाय. तर, दुसरीकडं आरसीबीनं दहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले तर, पाच सामने गमवाले आहेत. या सामन्यात आरबीच्या संघाला चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडून सावध राहावं लागणार आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहिल्यास जडेजा आरसीबीसाठी धोकादायक ठरल्याचं दिसत आहे.
आरसीबीविरुद्ध रवींद्र जाडेजाची घातक गोलंदाजी
आयपीएलमध्ये आजवर चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (CSK vs RCB) हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुनं नऊ सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णीत राहिला आहे. आरसीबीविरुद्ध जाडेजा जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. त्यानं आरसीबीविरुद्ध आतापर्यंत 29 सामने खेळले आहेत. ज्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत. आरसीबीविरुद्ध रवींद्र जाडेजा सर्वाधिक विकेट्स घेतले आहेत. यंदाच्या हंगामात रवींद्र जाडेजाचं प्रदर्शन खराब होतं. त्यानं या हंगमात 9 सामन्यात 113 धावा केल्या आहेत. तर, पाच विकेट्स घेतल्या आहेत.
रवींद्र जाडेजाची आयपीएलमधील कामगिरी
विशेष म्हणजे, जडेजाची एकूण कामगिरी चांगली झाली आहे. आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 209 सामन्यांमध्ये त्याने 2499 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 62 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. जडेजाने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 132 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 16 धावांत 5 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेत त्याने 3 वेळा चार किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-