IPL 2023, CSK vs GT Final : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला. चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडू याने निवृत्तीच्या या सामन्यात यादगार अशी खेळी केली. त्याने 8 चेंडूत 19 धावांची खेळी दमदार खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिलं. रायडूनं मोक्याच्या वेळी केलेली ही छोटी खेळी संघाला विजय मिळवून देण्यात फार महत्त्वाची ठरली. अंतिम सामन्याआधी अंबाती रायडूनं आयपीएलमधील निवृत्तीची घोषणा केली होती.
अंबाती रायडू आयपीएलमधून निवृत्त
अंबाती रायडूनं 28 मे रोजी ट्वीट करत निवृत्तीची घोषणा केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. आयपीएल 2023 चा अंतिम सामन्यानंतर तो निवृत्ती घेणार असल्याचं रायडूनं सांगितलं होतं. त्यानं ट्वीट करत लिहिलं होतं की, 'मुंबई आणि चेन्नई या दोन संघाचा भाग होण्याची संधी मिळाली. 14 हंगाम 204 सामने, 11 प्लेऑफ, 8 फायनल आणि पाच आयपीएल चषके... आज सहावा चषक जिंकू अशी आशा आहे. अंतिम सामना माझ्या आयपीएल करिअरचा अखेरचा सामना असेल. सर्वांचे आभार.. अशी इमोशनल पोस्ट रायडूने केली आहे.'
विजयानंतर निवृत्तीबाबत रायडूची प्रतिक्रिया
अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर अंबाती रायडूनं निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रायडू म्हणाला की, ''माझ्या आयपीएल कारकिर्दीचा हा एका परीकथेप्रमाणे शेवट आहे. मी याहून अधिक काही मागू शकत नाही. मी चांगला खेळलो हे माझं भाग्य आहे. आता मी माझं उरलेलं आयुष्यासाठी आनंदात जगू शकतो. मी गेल्या 30 वर्षात संघासाठी मेहनत घेतली आणि चांगली कामगिरी केली. त्यानंतर संघासोबत अंतिम सामन्यात विजय मिळवून मला निवृत्ती घेण्याची संधी मिळाली, यासाठी मी आनंदी आहे. मी माझं कुटुंब आणि माझे वडील यांचा आभारी आहे, त्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं.''
रायडूसाठी चेन्नईची खास पोस्ट
अंबाती रायडूचे आयपीएलमधील कामगिरी
मागील 14 वर्षांपासून अंबाती रायडू आययीपएलमध्ये धावांचा पाऊस पाडतोय. 2010 पासू रायडूच्या आयपीएल करिअरला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 203 सामने खेळले आहेत. यामध्ये तो 33 वेळा नाबाद राहिलाय. अंबाती रायडू याने 128 च्या स्ट्राईक रेटने आणि 29 च्या सरासरीने 4329 धावा केल्या आहेत. रायडूने आतापर्यंत एक शतक आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. तर 171 षटकार आणि 358 चौकार ठोकले आहेत. त्याशिवाय 64 झेल आणि 2 स्टपिंगही त्याच्या नावावर आहेत. रायडूने याच्यासाठी 2018 चा हंगमात सर्वोत्कृष्ट होता. या हंगामात रायडूने 16 सामन्यात 602 धावांचा पाऊस पाडला होता.