IPL 2024 : आर्टिफिशल इंटेलिजन्सनं(AI) आयपीएलच्या पुढील 20 विजेत्यांचा अंदाज वर्तवला आहे. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स चषकावर नाव कोरेल, असा अंदाज एआयनं वर्तवला आहे. आयपीएलच्या 17 वा हंगाम आता ऐन रंगात आला आहे. राजस्थान आणि कोलकाता संघ गुणतालिकेत आघाडीवर आहेत, पण यंदा चषकावर नाव शुभमन गिलचा गुजरात टायटन्स कोरणार आहे, अशी भविष्यवाणी एआयनं केली आहे.
आरसीबी कधी जिंकणार ?
2008 पासून आरसीबीला आयपीएल चषकावर नाव कोरता आलेले नाही. मागील 17 वर्षांपासून आरसीबी चषकावर कधी नाव कोरणार? असा सवाल उपस्थित कऱण्यात येत आहे. पण एआयनं आरसीबी कधी जिंकणार याचं भाकित केले आहे. ChatGPT च्या मते आरसीबी 2029 मध्ये पहिल्यांदा चषकावर नाव कोरणार आहे. म्हणजेच आरसीबीच्या चाहत्यांना चषकासाठी आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीला सात सामन्यात फक्त एकच विजय मिळवता आलाय. आरसीबीचा संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आरसीबीला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. सध्याच्या मोसमातील प्लेऑफमध्ये पोहोचणे बेंगळुरूसाठी खूप कठीण आहे. AI च्या अंदाजानुसार, पुढील पाच हंगामातही RCB साठी अशाच संघर्षाचे असू शकतो. आयपीएल 2024 मध्ये, आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये फक्त एक विजय मिळवला आहे. फलंदाजीपासून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणापर्यंतही संघ अपयशी ठरत आहे. तिन्ही क्षेत्रात खराब कामगिरी कोणत्याही परिस्थितीत संघाला चॅम्पियन बनवू शकत नाही. 2020 ते 2022 पर्यंत आरसीबी लागोपाठ प्लेऑफमध्ये दाखल झाली होती, पण त्यांना चषकावर नाव कोरता आलं नाही. 2023 मध्येही आरसीबीच्या संघाने खराब कामगिरी केली होती. आरसीबीला प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. यंदाही आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमीच आहे.
यंदाच्या हंगामात शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स चषकावर नाव कोरणार आहे. पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्स चषकावर नाव कोरणार असल्याचा अंदाज एआयनं वर्तवला आहे. मुंबई इंडियन्स 2026 मध्ये पुन्हा चॅम्पियन होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. तर हैदराबाद 2027 मध्ये आणि पंजाब 2028 मध्ये चॅम्पियन होईल, असेही एआयनं सांगितलं. दिल्लीचा संघ 2030 मध्ये आयपीएलचा चॅम्पियन होआईल, असा अंदाज वर्तवलाय. लखनौचा संघ 2033 मध्ये चॅम्पियन होआईल. राजस्थान संघ 2032 मध्ये चषकावर नाव कोरेल.