Abhishek Nayar KKR News : BCCI ने टीम इंडियातून हकालपट्टी केली, केकेआरने नवीन संधी दिली; जुना भिडू कोलकात्याच्या ताफ्यात दाखल
बीसीसीआयने टीम इंडियाच्या नोकरीवरून काढून टाकल्यानंतर प्रशिक्षक अभिषेक नायर यांना नवीन नोकरी मिळाली आहे.

Abhishek Nayar rejoins Kolkata Knight Riders support staff : बीसीसीआयने टीम इंडियाच्या नोकरीवरून काढून टाकल्यानंतर प्रशिक्षक अभिषेक नायर यांना नवीन नोकरी मिळाली आहे. टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून अलिकडेच काढून टाकण्यात आलेले अभिषेक नायर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतले आहेत. नायर त्याच्या मागील फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतला आहे. कोलकाता यांनी शनिवारी 19 एप्रिल रोजी ही माहिती दिली. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने अलीकडेच नायरला संघातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.
जुना भिडू कोलकात्याच्या ताफ्यात दाखल
मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर (Abhishek Nayar KKR News) गेल्या हंगामापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. तो अनेक हंगामांपासून या फ्रँचायझीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम करत होता. आता एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, नायर पुन्हा केकेआरमध्ये परतला आहे. नायरचे पुनरागमन अशा वेळी झाले आहे जेव्हा कोलकाता या हंगामात संघर्ष करत आहे आणि आतापर्यंत त्यांनी 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. नायरच्या पुनरागमनामुळे संघातील खेळाडूंना मदत होईल अशी अपेक्षा आहे.
Welcome back home, @abhisheknayar1 💜 pic.twitter.com/IwJQTnAWxa
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 19, 2025
BCCI ने टीम इंडियातून हकालपट्टी केली
2024 मध्ये जेतेपद जिंकणाऱ्या कोलकाताच्या कोचिंग स्टाफमध्ये नायर (Abhishek Nayar KKR News) होते. त्यानंतर संघ आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर मार्गदर्शक गौतम गंभीरला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. त्यांच्यासोबत नायरलाही सहाय्यक प्रशिक्षक म्हणून टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले. पण 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याला संघातून वगळण्यात आले. जानेवारीमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर नायरविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीम इंडियाला कसोटी मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या काळात संघातील अनेक अंतर्गत बातम्याही माध्यमांमध्ये आल्या, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला. यासोबतच कोचिंग स्टाफमधील एक महत्त्वाचा सदस्यही त्याच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात आले. या सर्व मुद्द्यांवर आढावा बैठकीत चर्चा झाली, त्यानंतर एप्रिल महिन्यातच नायरला टीम इंडियामधून वगळल्याची बातमी आली. पण, बीसीसीआय किंवा नायर यांनी आतापर्यंत या प्रकरणात काहीही पुष्टी केलेली नाही परंतु आता कोलकात्यात परतल्यानंतर सर्व काही स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा -





















