MI vs GT Eliminator : 'या' पाच कारणांमुळे गुजरातचा घात झाला, मुंबई इंडियन्सने बाजी कुठे पलटवली?
हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरचं तिकीट मिळवलंय.

MI vs GT Eliminator : हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरचं तिकीट मिळवलंय. आता त्यांची गाठ रविवारी श्रेयस अय्यरच्या पंजाब टीमशी पडणार आहे. चंदिगडला आज झालेल्या चुरशीच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरात टायटन्सला 20 धावांनी पराभूत केलं. विजयासाठीच्या 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला सहा बाद 208 धावाच करता आल्या. सलामीवीर साई सुदर्शनने 49 चेंडूंमध्ये 80 तर वॉशिंग्टन सुंदरने 24 चेंडूंमध्ये 48 धावांची आक्रमक खेळी करत सामन्यात रंग भरले होते. ही जोडी फुटल्यावर मात्र मुंबईने गुजरातला रोखलं आणि स्पर्धेतून आऊट केले. अशा परिस्थितीत, गुजरातविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी कुठे पलटवली जाणून घेऊया....
Next stop: Qualifier 2️⃣ 😍@mipaltan are all set to meet the @PunjabKingsIPL for a ticket to glory 🎟
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph#TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/vK0oAjcG5s
गुजरात टायटन्सच्या खराब क्षेत्ररक्षणाचा मुंबई फायदा....
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना, गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीला नक्कीच दबाव निर्माण केल्या असता, परंतु खराब क्षेत्ररक्षणामुळे संघाचा पराभव झाला. विशेषतः रोहित शर्माचे तीन झेल चुकले जे गुजरातसाठी महागडे ठरले.
रोहित शर्माने 81 धावांची सामना मॅच विनिंग खेळी!
मुंबई इंडियन्सकडून फलंदाज रोहित शर्माने शानदार 81 धावा केल्या. त्याने 50 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळीदरम्यान रोहितने आयपीएलमधील 300 षटकारही पूर्ण केले. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने 47, सूर्यकुमार यादवने 33, तिलक वर्मा यांनी 25 आणि कर्णधार हार्दिक पांड्याने नाबाद 22 धावांचे योगदान दिले.
𝘾𝙤𝙢𝙚𝙩𝙝 𝙩𝙝𝙚 𝙝𝙤𝙪𝙧, 𝙘𝙤𝙢𝙚𝙩𝙝 𝙩𝙝𝙚 𝙃𝙞𝙩𝙢𝙖𝙣 ✨
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Rohit Sharma's composed 81(50) wins him the Player of the Match award 👏
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/PILBfEJNlA
गेराल्ड कोएत्झीच्या शेवटच्या ओव्हर्मध्ये 22 धावा...
गेराल्ड कोएत्झीने मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरातकडून गोलंदाजीत खूप धावा दिल्या. कोएत्झीने त्याच्या तीन षटकांत 51 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. कोएत्झी गोलंदाजीत महागडा ठरणे हे देखील गुजरातच्या पराभवाचे एक मोठे कारण बनले, या ओव्हरने मुंबईचा स्कोअर 220 च्या पार नेला आणि गुजरातसाठी लक्ष्य जास्त कठीण केलं.
I.C.Y.M.I
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
𝙂𝙤𝙞𝙣𝙜...𝙂𝙤𝙞𝙣𝙜...𝙂𝙤𝙣𝙚 💥
Enjoy Hardik Pandya's finishing touch 💪
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/w6LZWM9Kyf
बुमराहचा शानदार यॉर्कर
बुमराहने नेहमीप्रमाणे यावेळीही आपली ‘डेथ ओव्हर स्पेशालिटी’ सिद्ध करत 4 षटकांत केवळ 27 धावा देत 1 महत्त्वाची विकेट घेतली. त्याच्या यॉर्कर्सपुढे गुजरातचे फलंदाज हतबल ठरले. बुमराहने शानदार यॉर्कर टाकला आणि सुंदरला 48 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर आऊट केले. यामुळे, आता संपूर्ण दबाव सुदर्शनवर होता आणि सामना मुंबईच्या दिशेने जाऊ लागला.
Two moments of brilliance ⚡️
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Were these two the defining moments of the #Eliminator? 🤔
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph#TATAIPL | #GTvMI | #TheLastMile | @mipaltan pic.twitter.com/7hDL0s5Mye
साई सुदर्शनची विकेट
सुदर्शनसमोर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे स्टार गोलंदाज हतबल दिसत होते. साई सुदर्शनने मुंबईविरुद्ध तुफानी फलंदाजी केली आणि 49 चेंडूत 80 धावा केल्या. अशाप्रकारे शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर तो हुकला. आयपीएलमधील सुदर्शनचे हे तिसरे शतक ठरले असते. या डावात सुदर्शनने 1 षटकार आणि 10 चौकार मारले.पण त्याची विकेट पडली आणि मुंबईने सामन्याची पकड घट्ट केली.
𝙈𝙄-𝙜𝙝𝙩𝙮 effort on a 𝙈𝙄-𝙜𝙝𝙩𝙮 occasion 💙@mipaltan seal the #Eliminator with a collective team performance ✌
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQNeP#TATAIPL | #GTvMI | #TheLastMile pic.twitter.com/cJzBLVs8uM





















