IPL Auction Registration : आयपीएल लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. दुबई आयपीएल लिलावाचे आयोजन करणार आहे. या लिलावासाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र यांच्यासह 1166 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. तथापि, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने लिलावासाठी आपले नाव नोंदवलेले नाही, म्हणजेच जोफ्रा आर्चर आयपीएल लिलावाचा भाग असणार नाही. अलीकडेच मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला सोडले होते.






830 भारतीय खेळाडूंशिवाय 336 परदेशी खेळाडू असतील 


ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या लिलावाचा भाग असण्याबाबत शंका होत्या, मात्र या खेळाडूने लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे. आयपीएल लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. ज्यामध्ये 830 भारतीय, तर 336 परदेशी खेळाडू असतील. 212 कॅप्ड खेळाडू आहेत, याशिवाय 909 अनकॅप्ड खेळाडू आहेत. तसेच सहयोगी देशांतील 45 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत.






हर्षल पेटलसह या खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी 


या लिलावात वरुण आरोन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर सरन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, हनुमाला विहारी.संदीप वॉरियर आणि उमेश यादवसारखे भारतीय खेळाडू असतील. हर्षल पटेलशिवाय केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव या खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे.






तथापि, जोफ्रा आर्चर लिलावात भाग घेणार नाही. गेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने सुमारे 6 कोटी रुपये खर्च केले होते आणि त्यात जोफ्रा आर्चरचा समावेश होता, मात्र दुखापतीमुळे तो बहुतांश सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. रिलीजनंतर जोफ्रा आर्चर लिलावात जाईल, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही.


इतर महत्वाच्या बातम्या