IPL 2026 Ajinkya Rahane : सध्या देशरात सध्या आयपीएल 2026 चाउत्साहआहे. अशातच गुरुवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) (एसआरएच) यांच्यात सामना खेळला गेला. केकेआर हा सामना 65 धावांनी हरला. या सामन्यात कर्णधार रहाणेची बॅट म्हणावीतशी चालली नाही. तो 10 चेंडूंमध्ये ८ धावा करून बाद झाला. यावरचाहत्यांनीनाराजीव्यक्तकेलीअसून टीकाकारांनी रहाणेच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यावर त्याने सामन्यानंतर उत्तर दिले.

Continues below advertisement

Ajinkya Rahane : मी स्वतःवर विश्वास ठेवतो, जे कोणी याबद्दल बोलताय त्यांना बोलू द्या

यावेळीबोलताना रहाणे म्हणाला कि, मी फारसा चिंतेत नाही, माझा हेतू तसाच होता. कधीकधी फलंदाज म्हणून लय किंवा ताळमेळ मिळत नाही. जे लोक बोलत आहेत, त्यांना एकतर खेळ कळत नाही किंवा त्यांना वाटतं की मी वेगळ्या प्रकारची खेळी करावी. अजिंक्य रहाणे आपल्या खेळात इतकी सुधारणा करेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती. ते माझ्याबद्दल बोलत आहेत याचा मला आनंद आहे. मग ते नकारात्मक असो वा सकारात्मक. त्यांना बोलू द्या. पण फिन ॲलनसोबत भागीदारी करणे खूप चांगले झाले आहे. पहिल्या सहा षटकांमध्ये तुम्हाला निर्भयपणे आणि मोकळेपणाने क्रिकेट खेळण्याची गरज असते. कधीकधी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, ते ठीक आहे, ते स्वीकारणे महत्त्वाचे आहे. असेही कर्णधार रहाणे म्हणाला.

Continues below advertisement

"पण मी काय करत आहे हे मला माहीत आहे, मी भूतकाळात काय केले आहे हे देखील मला माहीत आहे, आणि इतर लोक काय म्हणत आहेत याचा विचार करण्याऐवजी मी स्वतःवर विश्वास ठेवतो. जे कोणी याबद्दल बोलत आहेत, त्यांना बोलू द्या." अशीप्रतिक्रियाकर्णधार रहाणे यांनेदिली.

Ishan Kishan : ईशान किशनच्या नेतृत्त्वाखाली संघाचा यंदाचा पहिला विजय

सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2026 मधील दुसऱ्या सामन्यात अखेरीस विजयाचं खातं उघडलं आहे. हैदराबादने ईडन गार्डन्सच्या मैदानावर केकेआरचा तब्बल 65 धावांनी दारूण पराभव केला आहे. सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संपूर्ण संघ 161 धावांवर सर्वबाद झाला. हैदराबादने या सामन्यात खराब फिल्डिंग केल्याने केकेआरला अनेक धावा सहजी मिळाल्या. पण संघाच्या गोलंदाजांनी मात्र उत्कृष्ट कामगिरी केली. कर्णधार इशान किशनच्या नेतृत्त्वाखाली हा संघाचा यंदाचा पहिला विजय आहे.

कर्णधार रहाणे 8 धावा करत माघारी परतला, अंगक्रिश रघुवंशीने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात दणक्यात झाली. फिन एलनने पहिल्याच षटकात 25 धावा कुटत संघाला वादळी सुरूवात करून दिली. यानंतर पुढच्याच षटकात हर्ष दुबेने आपल्या गोलंदाजीवर त्याला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. एलन 7 चेंडूत 28 धावा करत बाद जाला. तर कर्णधार रहाणे 8 धावा करत माघारी परतला. तर अंगक्रिश रघुवंशीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. रघुवंशीने 26 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या आणि सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. तर उपकर्णधार रिंकू सिंहने 35 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला, मात्र त्याला दुसऱ्या टोकावरून अपेक्षित साथ न मिळाल्याने धावांचं अंतर वाढत गेलं आणि परिणामी केकेआरने विकेट्सदेखील गमावल्या.

केकेआरकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. यानंतर इशान मलिंगा आणि नितीश रेड्डी या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्ष दुबेने फिन एलनला बाद करत संघाला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली.