IPL 2021, KKR vs PBKS: केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने दुबई  येथे खेळलेल्या आयपीएल 2021 च्या 45 व्या सामन्यात  कोलकाता नाईट रायडर्सचा  पाच गडी राखून पराभव केला. पंजाबच्या या विजयाचा शिल्पकार कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने 55 बॉलमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह 67 धावा केल्या. राहुलने मयंक अग्रवाल (40) सह पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली. कोलकाताने पहिल्यांदा खेळत 20 षटकात सात विकेट गमावत 165 धावांचे आवाहन पंजाबला दिले. पंजाबने हे आव्हान पाच विकेट गमावक शेवटच्या षटकात पूर्ण केले. 


पंजाबच्या विजयाचे खरे शिल्पकार मयंक अग्रवाल आणि केएल राहु आहे. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 8.5 षटकात 70 धावा केल्या. मयंक 27  बॉलमध्ये 40 धावा करत बाद झाला. मयंकने तीन चौकार आणि तीन षटकारात 40 धावा केल्या. पूरनने सात बॉलमध्ये 12 धावा केल्या एडम मार्करमने 16 बॉलमध्ये 18 रन केले. 


नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु केकेरआची सुरुवात खराब झाली.  सलामीवीर शुभमन गिल पंजाबचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगच्या चेंडूवर बाद झाला आहे. गिल 7 धावा करुन बाद झाला आहे. व्यंकटेश अय्यरने  अर्धशतक झळकावलं. त्याच्या 67 धावांसह राहुल त्रिपाठीच्या 34 आणि नितीश राणाच्या 31 धावांच्या जोरावर केकआरने 165 धावांपर्यंत मजल मारली आहे.