IPL 2021: इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने शारजाह येथे खेळलेल्या IPL 2021 च्या 54 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 86 धावांनी पराभव केला. यासह, केकेआरने प्लेऑफसाठी आपला दावा भक्कम केला आहे. कोलकात्याचे आता 14 गुण झाले असून आता त्यांचं प्ले ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. आज जर मुंबईनं सामना गमावला तर मुंबई सहज प्ले ऑफमधून बाहेर पडेल. तसंही मुंबईचा प्ले ऑफचा खूप कठिण झाला आहे.
मुंबई इंडियन्स जर आज सामना 14 गुण मिळवण्याची संधी आहे. पण त्यांच्यासमोर नेट रनरेटचं भलंमोठं चॅलेंज आहे. कोलकाता संघाने राजस्थानविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा रनरेट सर्व संघापेक्षा अधिक आहे. त्यांचा +0.785 रनरेट आहे. तर, मुंबईचे सध्या 12 गुण असून – 0.048 रनरेट आहे. मुंबईचा एक सामना बाकी आहे. आज मुंबई हैदराबादविरुद्ध लढणार आहे. या सामन्यात मुंबईला विजय आवश्यक आहे, मात्र हा विजय त्यांना भल्यामोठ्या फरकाने मिळवावा लागणार आहे. त्यातही हैदराबादनं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली तरीही मुंबई प्ले ऑफमधून बाहेर पडेल.
चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरु संघानं आपले प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले आहेत. दिल्ली 20 अंकांसह टॉपवर आहे तर चेन्नई 18 अंकांसह नंबर दोनवर आहे तर बंगळुरुचे 16 अंक असून तिसऱ्या नंबरवर आहे. तर कोलकाता 14 अंकांसह चौथ्या नंबरवर आहे. आता चौथ्या स्थानासाठी मुंबईला न भुतो न भविष्यती असा विजय साकारावा लागणार आहे. पंजाबचे गुणतालिकेत 12 गुण आहेत, तर राजस्थानही पराभूत झाल्यामुळे 10 गुणांवर कायम राहिले. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. सनरायझर्स हैदराबाद या स्पर्धेतून खराब कामगिरीमुळे सर्वात आधी बाहेर पडला आहे.
आजचा सामना जर मुंबईचा संघ हरला तर कोलकाता त्यांच्या गुणांच्या आधारेच प्लऑफसाठी थेट पात्र होईल. पण जर मुंबईने हा सामना जिंकला, तर मात्र नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबतीत जर मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा झाल्यास त्यांना कोलकातापेक्षाही अधिक रनरेट मिळवावा लागेल. मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 200 धावा करुन हैदराबादला 170 पेक्षाही अधिक धावांनी पराभूत करावे लागेल. तसेच जर त्यांना या सामन्यात धावांचा पाठलाग करावा लागला, तर मात्र त्यांचा नेटरनरेट कोलकातापेक्षा अधिक होणार नाही. हैदराबादने प्रथम फलंदाजीसाठी उतरताच मुंबईचे आयपीएल 2021 मधील आव्हान संपुष्टात येणार आहे.