आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये महेंद्रसिंह धोनी सर्वात लकी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्त्वात चेन्नईने दोन वेळा चॅम्पियन होणं आणि चार वेळा प्लेऑफपर्यंत पोहोचणं यामुळे धोनीचं पारडं नक्कीच जड मानलं जात आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये 56 सामन्यांमध्ये धोनी सर्वात लकी कर्णधार ठरला, कारण त्याने 14 पैकी नऊ वेळा नाणेफेक जिंकली. याबाबतीत कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकही धोनीच्याच जवळ आहे, त्याने आठ वेळा नाणेफेक जिंकली होती.
यंदाच्या आयपीएलमध्ये नाणेफेकीच्या बाबतीत रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना मोठं अपयश आलं. दोघांनीही प्रत्येकी पाच पाच वेळाच नाणेफेक जिंकली. तर विराट कोहली आणि केन विल्यम्सनने प्रत्येकी सात-सात वेळा नाणेफेक जिंकली.
दरम्यान, या आयपीएलमध्ये बहुतांश संघांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला. धोनीने नऊ वेळा नाणेफेक जिंकली आणि केवळ एकच वेळा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.