टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी ‘जम्बो’ अर्ज
गांगुली, लक्ष्मण, तेंडुलकर मुलाखती घेणार!
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर मुलाखती घेणार आहेत. सचिन तेंडुलकर सध्या लंडनमध्ये असल्याने तो व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखतीत सहभागी होईल. आज सर्वच उमेदवारांच्या मुलाखती होतील, असं सांगत बंगाल क्रिकेट संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सचिन, सौरव आणि लक्ष्मण निवडणार टीम इंडियाचा कोच!
कोलकातामध्ये दुपारी 1.30 वाजता बैठक
प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत दोन-तीन दिग्गजांचाही समावेश आहे. आज दुपारी दीड वाजता बैठक सुरु होणार असून संजय जगदाळे याचं आयोजन करणार आहेत. रवी शास्त्री, अनिल कुंबळे, संदीप पाटील यांच्याशिवाय विक्रम राठोड, प्रवीण आमरे, बलविंदर संधू आणि व्यंकटेश प्रसादही या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 57 जणांचे अर्ज
सल्लागार समितीच्या सूचना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याकडे पाठवण्यात येतील. यानंतर 24 जून रोजी धरमशालामधील कार्यसमितीच्या बैठकीत प्रशिक्षकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.