नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आयोजन करणाऱ्या क्रिकेट स्टेडियम्सच्या खेळपट्ट्यांचं कठोर परिक्षण करण्याची भूमिका आयसीसीनं घेतली आहे.
प्रत्येक सामन्यानंतर खेळपट्टी आणि मैदानाच्या स्थितीच्या आधारे स्टेडियमला श्रेणी बहाल केली जाईल. खराब स्थितीतल्या स्टेडियम्सना नकारात्मक गुण दिले जाणार आहेत.
पाच वर्षांच्या कालावधीत एखादया स्टेडियमच्या खात्यात दहा नकारात्मक गुण जमा झाले, तर त्या स्टेडियमवर दोन वर्षांसाठी बंदीची कारवाई केली जाईल.
एखाद्या स्टेडियमला पाच नकारात्मक गुण मिळाल्यास, त्या स्टेडियमवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात येईल. दुबईत आयसीसीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.