INDW vs ENGW : नवी मुंबईमधील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियानं भक्कम मजल मारली आहे. टीम इंडियानं पहिल्या दिवशी 7 गड्यांच्या मोबदल्यात 410 धावांचा डोंगर रचला. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मानधना 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यावेळी भारताची धावसंख्या 25 धावा होती. यानंतर शेफाली वर्मा केट क्रॉसच्या चेंडूवर 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.


शुभा, जेमिमा, यास्तिका आणि दीप्तीची फिफ्टी


47 धावांपर्यंत टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये गेले होते. मात्र यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि शुभा सतीश यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. शुभा सतीशने 69 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्ज लॉरेन बेलच्या चेंडूवर 69 धावा करून बाद झाली. यानंतर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर 49 धावा करून धावबाद झाली. यास्तिका भाटियाने 88 चेंडूत 66 धावा केल्या.






टीम इंडियाच्या 4 फलंदाजांचे अर्धशतक 


भारताकडून अष्टपैलू दीप्ती शर्मा 60 धावा करून नाबाद परतली. स्नेह राणाने 30 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी स्नेह राणाला नॅट सीव्हर ब्रंटने बोल्ड केले. सध्या भारताकडून दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर क्रीजवर आहेत. पहिल्या दिवशी भारतासाठी 4 फलंदाजांनी अर्धशतक केली. मात्र, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर 49 धावांवर धावबाद झाली, त्यामुळे तिला पन्नास धावांचा टप्पा गाठता आला नाही.






इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर लॉरेन बेल ही सर्वात यशस्वी गोलंदाज होती. लॉरेन बेलने 2 फलंदाज बाद केले. याशिवाय केट क्रॉस, नॅट सीव्हर ब्रंट, शार्लोट डीन आणि सोफी एक्लेस्टोन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.


इतर महत्वाच्या बातम्या