कानपूर: कानपूरच्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडनं भारतावर सात विकेट्स आणि 11 चेंडू राखून मात केली. तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली.
ग्रीनपार्क स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडला 148 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि सॅम बिलिंग्स या इंग्लंडच्या सलामीवीरांनी 43 धावांची भागीदारी रचली.
भारताचा लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं चौथ्या षटकात या दोघांना माघारी धाडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पण त्यानंतर कर्णधार मॉर्गननं ज्यो रूटसह तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा विजय निश्चित केला.
मॉर्गनननं 51 धावांची खेळी केली. तर रूटनं नाबाद 46 धावा फटकावल्या. त्याआधी इंग्लंडच्या गोलंदाजांनीभारताला 20 षटकांत सात बाद 147 धावांवर रोखलं होतं. भारताकडून धोनीनं सर्वाधिक 36 धावा केल्या तर सुरेश रैनानंही झटपट 34 धावा फटकावल्या.