केपटाऊन : भारतीय संघ सध्या द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कसून सराव करत आहे. उद्यापासून (शुक्रवारी) केपटाऊनमध्ये पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. पण यावेळी भारतीय वंशाचाच एक फिरकीपटू टीम इंडियाच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.
द. आफ्रिकेचा संघात डावखुरा फिरकीपटू केशव महाराजची निवड करण्यात आली आहे. केशव हा भारतीय वंशाचा आहे.
केशवनं 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून त्याची कामगिरी उत्तम आहे. केशव आतापर्यंत 14 कसोटी खेळला असून त्यानं जवळपास 25च्या सरासरीनं 56 बळी घेतले आहेत. 2017 साली 48 बळी मिळवत केशव द. आफ्रिकेचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्यामुळे हा फिरकीपटू भारतीय फलंदाजांना रोखू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, एकेकाळी केशवचे वडीलही क्रिकेटर होते. पण ते कधीही राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकले नाही. पण आता उद्यापासून भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात केशव द. आफ्रिकेचं प्रतिनिधीत्व करणार आहे.
फिरकीपटू केशव महाराज टीम इंडियाच्या अडचणी वाढवणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jan 2018 03:58 PM (IST)
भारतीय संघ सध्या द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कसून सराव करत आहे. उद्यापासून (शुक्रवारी) केपटाऊनमध्ये पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. पण यावेळी भारतीय वंशाचाच एक फिरकीपटू टीम इंडियाच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -