अहमदबाद : वर्ल्डकपमधील सर्वात रोमांचक असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकत पहिल्यांदा पाकिस्तानला (India vs Pakistan) फलंदाजासाठी आमंत्रित केले. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अब्दुल्ला शफिक (Abdullah Shafique) आणि इमाम हुल हक (Imam-ul-Haq) यांनी केली. दोघांनीही सुरुवातीला सात चौकार फटकावत आठ शतकापर्यंत 41 धावा जोडत चांगली सुरुवात केली. अब्दुल्ला शफीकला मोहम्मद सिराजने एका शानदार चेंडूवर एलबीडब्ल्यू करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर बाबर आझम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. 


हार्दिक पांड्याचा मंत्र अन् पुढच्याच चेंडूवर विकेट 


बाबर आणि इमाम उल हकने पहिल्या विकेटनंतर धावफलक हलता ठेवला. हार्दिक पांड्याच्या 13 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इमामने  कट करत चौकार ठोकला. तिसरा चेंडू फेकण्यापूर्वी हार्दिक पांड्या मान खाली घालून चेंडूवर समोर धरुन  मंत्र म्हणताना दिसून आला. यानंतर टाकलेल्या त्याच चेंडूवर इमामचा राहुलने डावीकडे झेप मारत झेल पकडला. त्यामुळे पाकिस्तानला दुसरा हादरा बसला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था दोन बाद 73 झाली. 


चाचपडणारा रिझवान थोडक्यात वाचला 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील हिरो जडेजाला रोहितने 14 व्या षटकांमध्येच पाचारण केले. त्याने दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद रिझवानला चकवले आणि पायचित झाला. मात्र, त्याने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये बाॅल ट्रॅकमध्ये बाहेर असल्याचे दिसून आल्याने पाकिस्तानचा जीव भांड्यात पडला. अन्यथा पाकिस्तानची अवस्था बिकट झाली होती. 


दुसरीकडे, अलीकडेच आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून एकतर्फी पराभव झाला. पाकिस्तानने अलीकडेच एका उच्च धावसंख्येच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता, तर रोहित शर्माचा संघ अफगाणिस्तानला एकतर्फी सामन्यात पराभूत करून अहमदाबादला पोहोचला आहे. एक लाखाहून अधिक चाहते स्टेडियममध्ये असतील आणि सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर असतील.


इतर महत्वाच्या बातम्या