मुंबई : एकीकडे टीम इंडियाने (Team india) पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर 165 धावांनी विजय मिळवला असून दुसरीकडे टीम इंडियाच्या हॉकी (Hokey) संघानेही वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे. भारताच पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारत विजय मिळवला. टीम इंडियाने बुधवारी नेदरलँड्समधील आम्सटलवेन स्टेडियमवर हॉकी विश्वचषक 2026 स्पर्धेतील पूल-डीच्या ( 4 गटात विभागलेले संघ) सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) 5-3 असा पराभव केला. विशेष म्हणजे तब्बल 16 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान संघांत विश्वचषक स्पर्धेत हॉकीचा सामना पाहायला मिळाला. त्यामुळे, टीम इंडियाच्या या विजयाचा वेगळाच आनंद आहे. 

Continues below advertisement

विश्वचषक हॉकी स्पर्धेत यापूर्वी 2010 मध्ये दिल्लीत भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले होते. त्या सामन्यातही भारताने पाकिस्तानचा 4-1 असा पराभव केला होता. आता विश्वचषकात पुन्हा एकदा टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत तिंरगा फडकवला. तसेच, या विजयासह भारतीय संघाने पुढील फेरीत प्रवेश केला असून पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. विश्वचषक स्पर्धेतील आजच्या सामन्यात सुरुवातीपासूनचा टीम इंडियाचा दबदबा दिसून आला. प्रथम क्वार्टरमध्येच भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांच्या खेळाच्या जोरावर 2-0 अशी आघाडी घेतली होीती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 गोल केल्यामुळे चुरशीचा सामना दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाहायला मिळाला. हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी अनुक्रमे 21 आणि 24 व्या मिनिटाला गोल केला. 

पाकिस्तानसाठी हन्नान शाहिद (22व्या मिनटावर) आणि सूफियान खान (25 व्या मिनटावर) यांनी दोन गोल केले. हन्नानने पाकिस्तानच्या संघासाठी गोलचं खातं खोललं. या सामन्यात एकूण 4 ग्रीन कार्ड दर्शवण्यात आले. त्यामध्ये, दोन ग्रीन कार्ड भारतीय खेळाडूंना आणि 2 पाकिस्तान खेळाडूंना मिळाले. तर, एक यलो कार्ड भारतीय संघाच्या आदित्य अर्जुनला मिळाले. दुसऱ्या क्वार्टरपर्यत टीम इंडियाने 4-2 अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पॅनल्टी शूटमध्ये एक गोल केला. त्यामुळे, तिसऱ्या क्वार्टरअखेर 5-2 अशी आघाडी भारताला मिळाली होती. अखेरच्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला एक गोल करता आला, पण तो गोल 46 व्या मिनिटांनी झाला. त्यामुळे, भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. टीम इंडियासह देशभरातील चाहत्यांनी जल्लोष केला. 

Continues below advertisement

विश्वचषक हॉकी स्पर्धेतील पूल-डी सामन्यात भारताने 5-3 ने पाकिस्तानला मात दिली. तसेच, 6 गुण मिळवत टीम इंडियाला पुढे नेले. मात्र, पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. तीन पैकी दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला, तर एक सामना ड्रॉ झाला. 

हेही वाचा

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा