Continues below advertisement


India vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया कप 2025 चा अंतिम सामना (India vs Pakistan Asia Cup 2025 Final) आज (28 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत हे दोन्ही संघ 41 वर्षांनी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने  या स्पर्धेत कोणत्याही संघाकडून एकही सामना गमावलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यावर खिळल्या आहेत. दोन्ही संघांमधील आशिया कप सामन्यादरम्यान मैदानावरील घडामोडी सुद्धा चर्चेत आहेत. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर बंदुकीच्या शैलीत बॅटने आनंद साजरा केला. हरिस रौफनेही चिथावणीखोर हावभाव केले. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीनंतर पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे बराच वाद रंगला असून तो अजूनही शमलेला नाही. 


 


भावना व्यक्त करण्यापासून रोखणार नाही (Team India vs Pakistan rivalry)


आता, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने अंतिम सामन्यापूर्वी स्पष्ट केले आहे की तो त्याच्या खेळाडूंना भारताविरुद्ध त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून रोखणार नाही, परंतु कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची खात्री करावी. उत्साह दाखवणे महत्वाचे असल्याचे तो म्हणाला. सामनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सलमान आघा म्हणाला की, "प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर आपण आपल्या वेगवान गोलंदाजांना त्यांचा उत्साह दाखवण्यापासून रोखले तर काय उरते? मी कोणालाही थांबवणार नाही, फक्त एकच अट आहे की कोणताही अनादर होणार नाही."


हात मिळवण्याची परंपरा (coin toss handshake controversy) 


पाकिस्तानी कर्णधाराने जुन्या काळाची आठवण करून दिली की हस्तांदोलन ही क्रिकेटमध्ये चांगली परंपरा आहे. मागील सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा उल्लेख केला. सलमान म्हणाला, "मी 2007 मध्ये अंडर-16 स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून, मी कधीही दोन संघांना सामन्यानंतर हस्तांदोलन न करताना पाहिले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कितीही वाईट असले तरी आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले."


मागील पराभवातून धडे (Asia Cup 2025 final news) 


सलमान आगाने कबूल केले की त्यांच्या संघाने या स्पर्धेत भारताविरुद्ध पहिले दोन सामने त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे गमावले. ते म्हणाले की भारत-पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव असतो. आम्ही शेवटचे दोन सामने गमावले कारण आम्ही भारतापेक्षा जास्त चुका केल्या. ही वस्तुस्थिती आहे.


आशिया कपमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव (IND vs PAK 2025 highlights)


आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सात विकेट्सने जिंकला. कुलदीप यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 21 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सहा विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.


इतर महत्वाच्या बातम्या