मुंबईवर्ल्डकपमधील सेमीफायनलच्या महामुकाबल्यात टीम इंडिया नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत आहे. 23व्या षटकात शुभमन गिल हॅमस्ट्रिंगमुळे पॅव्हेलियनमध्ये परतला. वेदना होत असल्याने कर्णधार रोहित शर्माने त्याला परत बोलावण्याचा निर्णय घेतला. वेदना कमी झाल्यानंतर विकेट पडल्यास तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. आता त्याच्या जागी श्रेयस अय्यर आला आहे. 






प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाच्या सलामीवीराने दमदार सुरुवात केली. विशेषत: भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या नेहमीच्याच शैलीत दिसला. रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, पण त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 8.2 षटकात 71 धावा जोडल्या.






रोहित शर्मा चांगली सुरुवात करून पॅव्हेलियनमध्ये परतला, पण किवी गोलंदाजांना दिलासा मिळाला नाही. रोहित शर्मानंतर शुभमन गिल आक्रमक झाला. शुभमन गिलने सुद्धा सहज धावा केल्या. सेमीफायनलचे दडपण भारतीय फलंदाजांवर दिसून आलं नाही. भारतीय फलंदाज नेहमीच्या शैलीत धावा काढत आहेत.






शुभमन गिलने संथ सुरुवात केल्यानंतर गिअर्स बदलला


विशेष म्हणजे संथ सुरुवात केल्यानंतर गिलने गिअर बदलला होता. एकेकाळी तो 14 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने केवळ 11 धावा करू शकला होता, पण जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसे त्याने 41 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने फक्त 27 चेंडूत धावा पूर्ण केल्या.