India vs Japan Asia Cup Hockey 2022 : हॉकी आशिया कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताचा विजय थोडक्यात हुकल्यानंतर आज भारतासमोर जपान संघाचं आव्हान असणार आहे. सलामीचा भारत-पाकिस्तान सामना 1-1 ने अनिर्णीत सुटल्यानंतर आज भारत जपान विरुद्ध मैदानात उतरेल. याआधी झालेली 2017 रोजीची आशिया कप स्पर्धा भारताने जिंकली होती. त्यामुळे यंदाही ही ट्रॉफी स्वत:कडे भारत ठेवू इच्छिणार असणार आहे.
स्पर्धेचा पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर आज भारतासमोर जपानचा संघ मैदानात उतरणार आहे. या टूर्नामेंटमध्ये भारताचं कर्णधारपद अनुभवी हॉकीपटू बीरेंद्र लाकरा (Birendra Lakra) याच्याकडे असेल. या स्पर्धेत यंदा दोन पूल असणार आहेत. ज्यात पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत.
कधी आहे सामना?
आज 24 मे रोजी भारत आणि जपान हॉकी संघामध्ये हा सामना पार पडत आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या गेलोरा, बुंग कार्नो स्टेडियम कॉम्पलेक्समध्ये खेळवला जाणार आहे.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत आणि जपान यांच्यातील आजची हॉकी मॅच भारतीय वेळेनुसार 5 वाजता सुरु होणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि जपान यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल.
हे देखील वाचा-