लंडन: भारताच्या इंग्लंड दौऱ्यातल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीला आजपासून सुरुवात होणार आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर हा सामना खेळवण्यात येईल. इंग्लंडनं पाच सामन्यांची कसोटी मालिका आधीच 3-1 अशी खिशात घातली आहे. त्यामुळे अखेरची कसोटी जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. ओव्हल कसोटीत भारतीय संघात मोठे बदल होण्याची अपेक्षा आहेत. मुंबईचा पृथ्वी शॉ या कसोटीत पदार्पण करण्याची चिन्हं आहेत. तर रविंद्र जडेजा आणि उमेश यादव यांचाही अंतिम अकरात समावेश होण्याची शक्यता आहे.
भारताची कामगिरी
वर्ष 2011- 4-0 ने पराभव, वर्ष 2014- 3-1 हाराकिरी, आणि यंदा पुन्हा एकदा टीम इंडियानं इंग्लिश भूमिवर कसोटी मालिकेत पराभवाची परंपरा कायम राखली. या पराभवामुळे अकरा वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजयाचं भारताचं स्वप्न अधुरंच राहीलं.
भारताला इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या चारपैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता केनिंग्टन ओव्हलवरच्या शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ओव्हल कसोटीसाठी कोहलीचा भरवशाचा फलंदाज कोण?
लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला शेवटचा सामना खेळवला जातोय. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे या अखेरच्या कसोटीत विराट आणि त्याच्या शिलोदारांसमोर आव्हान असणार आहे ते नंबर वनची प्रतिष्ठा कायम राखण्याचं.
अॅलिस्टर कूकचा कसोटी क्रिकेटला अलविदा
अंतिम कसोटीसाठी भारतीय संघात मोठ्या बदलांची शक्यता आहे. सलामीच्या लोकेश राहुलऐवजी मुंबईच्या पृथ्वी शॉला पाचव्या कसोटीत संधी मिळण्याची चिन्हं आहेत. याशिवाय पहिल्या चारही कसोटीत अंतिम अकरात जागा न मिळालेला रवींद्र जाडेजा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव अंतिम कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे.
केनिंग्टन ओव्हलवरची ही लढाई भारताच्या दृष्टीनं जेवढी महत्वाची आहे तेवढीच इंग्लंडसाठीही. कारण या सामन्यात ज्यो रुटची इंग्लिश फौज आपला माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला विजयी निरोप देण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे ओव्हलवरची ही लढाई दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आणि प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारतोय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
भारताचा संघ
विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, हनुमा विहारी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर
संबंधित बातम्या
ओव्हल कसोटीसाठी कोहलीचा भरवशाचा फलंदाज कोण?
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानी कायम
अॅलिस्टर कूकचा कसोटी क्रिकेटला अलविदा
IndvsEng: प्रतिष्ठेची कसोटी, टीम इंडियात मोठ्या बदलाची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2018 08:12 AM (IST)
इंग्लंडनं पाच सामन्यांची कसोटी मालिका आधीच 3-1 अशी खिशात घातली आहे. त्यामुळे अखेरची कसोटी जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -