विशाखापट्टणम: विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात सर्व बाद 455 धावांची मजल मारली. भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं 267 चेंडूंत अठरा चौकारांसह 167 धावांची खेळी रचली. तर रवीचंद्रन अश्विननंही 95 चेंडूंत 58 धावांची खेळी केली.


या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली बाद झाल्यानंतर रिद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजा स्वस्तात माघारी परतले. त्यामुळं भारताची सात बाद 363 अशी अवस्था झाली होती. पण अश्विननं जयंत यादवच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचून भारताला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिली.

- इंग्लंडला पहिला धक्का, कॅप्टन कूक अवघ्या 2 धावांवर बाद

जयंत यादवनं 84 चेंडूंत 35 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी मोईन अली आणि जेम्स अँडरसननं प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या.

-----

विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाला चारशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारतानं आतापर्यंत सात बाद 421 धावांची मजल मारली असून रवीचंद्रन अश्विननं शानदार अर्धशतक झळकावलं आहे. तर जयंत यादव 26 धावांवर खेळत आहे.

- भारताला आठवा धक्का, आर. अश्विन 58 धावांवर बाद

विराट कोहली बाद झाल्यानंतर रिद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजा हे स्वस्तात बाद झाले. तर विराट कोहलीनं 267 चेंडूंत अठरा चौकारांसह 167 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी मोईन अली आणि जेम्स अँडरसननं प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या.

- आर. अश्विनचं अर्धशतक पूर्ण, भारत 7 बाद 421 धावा

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली 167 धावांवर बाद झाला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विराट कोहली 151 आणि अश्विन एका धावेवर खेळत होते. त्यानंतर आज सकाळी विराट अवघ्या 16 धावा करुन बाद झाला.


- भारताचा सातवा गडी बाद, रवींद्र जाडेजा शून्यावर बाद

- भारताला सहावा धक्का, रिद्धीमान साहा 3 धावांवर बाद

- टीम इंडियाला पाचवा धक्का, कर्णधार विराट कोहली 167 धावांवर बाद

-------------

पहिला दिवस:

चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या शतकी खेळींमुळं विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाला चार बाद 317 धावांची मजल मारता आली.

चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विराट कोहली 151 आणि अश्विन एका धावेवर खेळत होते.

खरं तर या सामन्यात भारताची दोन बाद 22 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी 226 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाचा डाव सावरला.

चेतेश्वर पुजारानं 204 चेंडूंत बारा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 119 धावांची खेळी केली. पुजाराचं कसोटी कारकीर्दीतलं हे दहावं शतक होतं. तर विराट कोहलीनं 241 चेंडूंतली नाबाद 151 धावांची खेळी पंधरा चौकारांनी सजवली.

विराट कोहलीचं कसोटीतलं हे चौदावं शतक होतं. दरम्यान दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलला भोपळाही फोडता आला नाही. तर मुरली विजय 20 आणि अजिंक्य रहाणे 23 धावांवर बाद झाले.