India Vs Afghanistan T20i series updates : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे बाहेर आहे. 2023 च्या विश्वचषकादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. पण आता पांड्या लवकरच मैदानात परतू शकतो. पांड्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेचा भाग असू शकतो. यासोबतच इंडिया प्रीमियर लीग 2024 मध्येही खेळणार आहे.






टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत (India Vs Afghanistan T20i Series Updates) पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. याआधी पांड्या दुखापतीमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेत खेळणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. यासोबतच तो आयपीएल 2024 मधूनही बाहेर जाऊ शकतो. पण ताज्या बातमीनुसार लवकरच पुनरागमन करणार आहे.


सूर्या जखमी झाल्याने हार्दिक पांड्याला लाॅटरी लागणार?


मागील दोन मालिकेत विजय मिळवून देणारा कॅप्टन सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्याने हार्दिक पांड्या तंदुरुस्त झाल्यास त्याला कॅप्टन पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सूर्याकडे जबाबदारी होती, तर रवींद्र जडेजा उपकर्णधार होता. मात्र, अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध बीसीसीआय रोहित शर्माला जबाबदारी देण्यास उत्सुक आहे. ऐनवेळी पांड्याच्या फिटनेसचा प्रश्न निर्माण झाल्यास बीसीसीआय रोहितकडे नेतृत्व देण्याच्या विचारात आहे. 






दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड केले आहे. संघाने त्याला कर्णधारही केलं आहे. पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. तसेच गुजरातला चॅम्पियन बनवले. आता तो मुंबईच्या संघात सामील झाला आहे. पांड्याच्या पुनरागमनामुळे रोहित शर्माला कर्णधारपद गमवावे लागले आहे. विश्वचषक 2023 दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पंड्याला दुखापत झाली होती. हा सामना पुण्यात झाला. त्याची दुखापत गंभीर होती. यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता. यानंतर तो दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही खेळू शकला नाही.


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारी 2024 मध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. यानंतर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. तिसरा सामना 17 जानेवारीला बेंगळुरू येथे होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या