india tour of australia 2025: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वनडे आणि टी-20 संघ जाहीर करण्यात आला. टीम इंडियाचा वनडेमधील यशस्वी कॅप्टन रोहित शर्माला बाजूला करून कसोटी कॅप्टन शुभमन गिलला वनडे संघाचे सुद्धा नेतृत्व देण्यात आलं आहे. उपकॅप्टनपदी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. आशिया कप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादववर टी-20 संघाची कर्णधारपदाची जबाबदारी कायम आहे. दुसरीकडे वनडे संघात रोहित आणि विराटला फलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे स्थान मिळवू शकला नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे दोघेही भारताकडून एकाच फॉरमॅटमध्ये खेळण्यास पात्र आहेत. रोहित आणि कोहली हे शेवटचे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून खेळताना दिसले होते, जिथे भारताने न्यूझीलंडला हरवून जेतेपद जिंकले होते.

Continues below advertisement

दोन्ही संघात स्थान मिळवणारे कोण? (Players in both ODI & T20I squads)

दरम्यान, शुभमन गिलसह अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग हे खेळाडू वनडे आणि टी-20 दोन्ही संघात कायम ठेवण्यात आले आहेत. या खेळाडूंवर सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे.  ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीवर तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेनंतर शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निवड समितीने अहमदाबादमध्ये संघ निवडीबद्दल चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.

मोहम्मद शमीनं काय पाप केलं? (Mohammed Shami dropped from India squad)

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा होती की वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश होईल. तथापि, जेव्हा संघ जाहीर करण्यात आला तेव्हा त्याचे नाव संघातून गायब होते. सततच्या दुर्लक्षामुळे शमीनं आणखी काय सिद्ध करायला हवं? अशी विचारणा होत आहे. 35 वर्षीय मोहम्मद शमी शेवटचा जून 2023 मध्ये भारतीय संघासोबत दिसला होता. त्या काळात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भाग घेतला होता. तेव्हापासून तो भारतीय संघात परतण्यासाठी संघर्ष करत आहे.

Continues below advertisement

शमीकडे दुर्लक्ष का केले जात आहे? (Mohd Shami India team exclusion reason) 

शमी 35 वर्षे 22 दिवसांचा आहे.  या वयात वेगवान गोलंदाज म्हणून त्याची तंदुरुस्ती राखणे अत्यंत आव्हानात्मक आहे. शिवाय, तो दुखापतीतून परतल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विशेष चांगली कामगिरी करू शकलेला नाही. दुसरीकडे, भारतीय संघ सध्या तरुणांवर अधिक विश्वास ठेवत आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग सारख्या तरुण खेळाडूंसह एक मजबूत गोलंदाजी गट तयार केला आहे. भविष्य लक्षात घेऊन, ते या खेळाडूंना सातत्याने संधी देत ​​आहेत. कदाचित म्हणूनच शमीला संघात स्थान मिळाले नाही.

भारताचे एकदिवसीय आणि T20 संघ (India tour of Australia 2025 squad)

एकदिवसीय : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल

T20: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सिंह, हर्षित सिंह, संजू सॅमसन, रिंकू सिंह आणि  वॉशिंग्टन सुंदर

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक (India vs Australia 2025 schedule)

  • 19 ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
  • 23 ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
  • 25 ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
  • 29 ऑक्टोबर: पहिला टी-20, कॅनबेरा
  • 31 ऑक्टोबर: दुसरा टी-20, मेलबर्न
  • 2 नोव्हेंबर: तिसरा टी-20, होबार्ट
  • 6 नोव्हेंबर: चौथा टी-20, गोल्ड कोस्ट
  • 8 नोव्हेंबर: पाचवा टी-20, ब्रिस्बेन

इतर महत्वाच्या बातम्या