Harsha Bhogle: हे सांगणे योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण खरं तर मी या भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आता उत्साहित नाही. दोन देशांमधील प्रतिस्पर्ध्यामध्ये आता पूर्वीसारखी उत्सुकता राहिलेली नाही कारण खेळाबाहेरील गोष्टी आता या स्पर्धेवर प्रभाव टाकत असल्याची थेट टीका समालोचक हर्ष भोगले यांनी केली आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना हर्ष भोगले म्हणाले की, पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची. तुमच्या आशा उंचावायच्या आणि पुन्हा खाली पडायच्या. प्रत्येक चेंडूगणिक तुम्हाला कधी खूप आनंद व्हायचा तर कधी खूप वाईट वाटायचे. तुम्ही एका मोठ्या भावनिक हिंदोळ्यावर असायचा.

युद्धासारखे हावभाव आणि व्यावसायिकता

सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना हर्ष भोगले म्हणाले, आपला हा प्रिय खेळ मोठ्या आर्थिक आणि राजकीय हेतूंसाठी ओलीस धरला जात आहे. हा सामना आता राजकीय डावपेचांसाठी वापरला जाणारा एक बाण झाला आहे, जिथे भू-राजकीय चिंता आणि गुण मिळवण्याला जास्त महत्त्व दिले जात आहे. खेळाच्या वातावरणाबद्दल ते म्हणतात, आपण नेहमीप्रमाणे प्रक्षोभक प्रोमोज बनवत आहोत. प्रत्येकाला सामावून घेण्यासाठी ड्रॉमध्ये बदल करत आहोत. लोक युद्धासारखे हावभाव (war-like gestures) करत आहेत. हे सर्व राजकारण आणि अर्थव्यवस्थेबद्दल आहे. मला वाटत नाही की आपण आता खेळाचा आनंद घेतो, उलट आपण त्याचे शोषण करत आहोत.

Continues below advertisement

Continues below advertisement

पाकिस्तानच्या खेळाडूंवर जास्त दडपण असेल

ते पुढे म्हणाले की, राजकीय हालचालींमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर जास्त दडपण असेल. ते म्हणाले, मैदानावरील पांढरी रेष ओलांडल्यावर त्यांचे खेळाडू सर्व काही विसरून मोकळेपणाने खेळू शकतील का? बाहेर काय घडले ते विसरून आपण फक्त खेळ खेळत आहोत, असे म्हणणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. भारताबाबत बोलताना त्यांनी सांगितले की भारतीय संघ सध्या अतिशय मोकळेपणाने खेळत आहे. भारताच्या डावामध्ये अभिषेक शर्मा हा कळीचा खेळाडू असेल. जर अभिषेक शर्मा पॉवरप्ले संपेपर्यंत मैदानात टिकला, तर तो सामना भारताच्या बाजूने झुकवू शकतो आणि इतरांसाठी चांगली पायाभरणी करू शकतो, असे भोगले यांनी नमूद केले. 

इतर महत्वाच्या बातम्या