मुंबई : पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहणाऱ्या दोन्ही देशातील असंख्य चाहत्यांना आयसीसीने थोडं निराश केलं आहे. आयसीसीने मंगळवारी (29 जानेवारी) 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर केला. भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील उत्तम 8 संघ टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 राऊंडमध्ये थेट खेळणार आहेत. ICC T20 World Cup 2020 | टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर या राऊंडमध्ये खेळणाऱ्या 12 संघांना दोन ग्रुपमध्ये विभाजित करण्यात आलं आहे. आता मुद्दा हा आहे की, भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत. यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना नॉकआऊट सामन्यापर्यंत (सेमीफायनल आणि फायनल) वाट पाहावी लागणार आहे. रँकिगमुळे सामना टळला 31 डिसेंबर 2018 रोजी आयसीसी जागतिक टी20 आंतरराष्ट्रीय संघाच्या रँकिंगमध्ये जे संघ टॉप 8 मध्ये आहे, त्यांना 2020 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 राऊंडमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. 31 डिसेंबर 2018 रोजी रँकिंगमध्ये पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर होता, त्यामुळे दोघांना एका गटात ठेवलेलं नाही. आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान समोरासमोर न येण्याची 2011 च्या वनडे विश्वचषकानंतरची ही पहिलीच वेळ आहे. शेवटचा सामना आशिया चषकात दहशतवादासह विविध मुद्द्यांवरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे दोन्ही देशांमधील  क्रिकेटचे सामने हे बऱ्याचदा आयसीसी आणि एशियन क्रिकेट काऊन्सिलद्वारे (एसीसी) आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्येच होतात. मागील वर्षी एसीसीने यूएईमध्ये आशिया चषकाचं आयोजन केलं होतं. तेव्हा भारताने पाकिस्तानविरोधात दोन सामने खेळले होते आणि दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. महिला टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीरभारत आणि पाकिस्तान संघ एकाच दिवशी खेळणार विशेष बाब म्हणजे टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघ एकाच दिवशी पण वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळणार आहेत. 24 ऑक्टोबरला सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानशी आहे. तर भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत पर्थमध्ये आहे. भारतीय वेळेनुसार सिडनीमधील सामना दुपारी 1.30 वाजता तर पर्थमधील सामना दुपारी 4.30 वाजता सुरु होणार आहे.