IND vs SA 2nd Test : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य होते, जे सहज गाठले. या विजयासह भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सेंच्युरियन कसोटीत भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.


आजवरच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंमध्ये कसोटी निकाली 


भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधील ही कसोटी केवळ 642 चेंडूंमध्ये निकाली ठरली. त्यामुळं आजवरच्या इतिहासात ती सर्वात कमी चेंडूंमध्ये निकाली ठरलेली कसोटी ठरली. 1932 साली ऑस्ट्रेलियानं मेलबर्न कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 72 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यावेळी ती कसोटी केवळ 656 चेंडूंमध्ये निकाली ठरली होती. 






दरम्यान, केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव तीन बाद 62 धावांवरून आज 176 धावांत आटोपला. त्यामुळं भारतासमोर विजयासाठी केवळ 79 धावांचं लक्ष्य होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीनं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी, भारताच्या जसप्रीत बुमरानं 61 धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.


केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय 


सेंच्युरियन कसोटीत भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताला 4 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर 2 सामने अनिर्णित राहिले होते. भारतीय संघ 1992 पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु केपटाऊनमध्ये एकही कसोटी जिंकलेली नाही. आता त्याने केपटाऊनमधील विजयाचा दुष्काळ संपवला आहे. एवढेच नाही तर केपटाऊनमध्ये कोणत्याही आशियाई देशाचा हा पहिला कसोटी विजय ठरला.


भारतीय संघासाठी दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने 23 चेंडूत 6 चौकारांसह 28 धावा केल्या. रोहित शर्मा 17 धावा करून नाबाद राहिला. यशस्वीशिवाय भारताने दुसऱ्या डावात विराट कोहली आणि शुभमन गिलचे विकेट गमावली. कोहलीने 12 आणि गिलने 10 धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या दुसऱ्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा करत पुढे आला. दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात डेव्हिड बेडिंगहॅमला जसप्रीत बुमराहने यष्टिरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद केल्यावर आफ्रिकेला मोठा धक्का बसला. बेडिंगहॅमला केवळ 11 धावा करता आल्या. त्यानंतर बुमराहने काइल वेरेनलाही स्वस्तात सोडवले. वीरेन बाद झाल्यामुळे आफ्रिकेची धावसंख्या पाच विकेट्सवर 85 धावा झाली. व्हेरिन बाद झाल्यानंतर काही वेळातच मार्करामने आपले अर्धशतक पूर्ण केले.






मार्करामने शतक झळकावून आफ्रिकेची लाज राखली 


दुसरीकडे, बुमराहची कहर गोलंदाजी सुरूच राहिली आणि त्याने मार्को जॅनसेनला बाद करून आफ्रिकेला सहावा धक्का दिला. त्यानंतर बुमराहने केशव महाराजला बाद करून आपली पाचवी विकेट घेतली. सहा विकेट पडल्यानंतर, एडन मार्करामने एकट्याने जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या 99 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मार्करामने 17 चौकार आणि दोन षटकारांसह 106 धावा केल्या. मार्करमला मोहम्मद सिराजने बाद केले. मार्कराम बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित दोन विकेट स्वस्तात पडल्या.


दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावांवरच आटोपला. भारताकडे 98 धावांची आघाडी असल्याने दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य होते. भारताकडून जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. मुकेश कुमार दोन, तर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ मोहम्मद सिराजच्या बळी गेला. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ 55 धावांवर बाद झाला. सिराजने अवघ्या 9 षटकांत 15 धावा देत 6 बळी घेतले. सिराजची कसोटी क्रिकेटमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी होती. मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. आफ्रिकन संघाकडून डेव्हिड बेडिंगहॅम (12) आणि काइल व्हेरीन (15) हे दोनच खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले.


इतर महत्वाच्या बातम्या