Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फा यनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने असणार आहेत. हा सामना रविवारी (दि.6)
 दुबईत खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंत वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. हे चार खेळाडू अंतिम फेरीत चांगले खेळले तर न्यूझीलंडचा पराभव जवळपास निश्चित होईल. गेल्या सामन्यातील न्यूझीलंडची कामगिरी पाहिली तर अंतिम फेरीतही भारताला कडवी टक्कर देऊ शकते.


भारताने ग्रुप मॅचमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात 42 धावा देत 5 बळी घेतले. वरुणची फिरकी न्यूझीलंडला अडचणीत आणू शकते. सध्या तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. वरुणने 7 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यासोबत मोहम्मद शमीही भारताच्या विजयात महत्त्वाचा ठरू शकतो. शमीने 4 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. अंतिम फेरीतील शमीची कामगिरीही महत्त्वाची ठरू शकते.


विराट कोहली आणि श्रेयस अय्यर आतापर्यंत अप्रतिम फॉर्ममध्ये दिसले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीने या स्पर्धेत भारतासाठी 217 धावा केल्या आहेत. त्याने शतकही ठोकले आहे. कोहलीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धही चमकदार कामगिरी केली होती. तो एक मोठा सामनावीर आहे. रेकॉर्डवर नजर टाकली तर अशा सामन्यांमध्ये ते नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसलाय. अय्यरबद्दल बोलायचे तर तो मधल्या फळीला मजबूत करतो. अय्यरने 195 धावा केल्या आहेत आणि अंतिम फेरीतही तो चमत्कार करू शकतो.


गेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेशचाही पराभव केला. सेमीफायनलमध्येही टीम इंडियाने दमदार कामगिरी केली होती. भारताने शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यामुळे आता टीम इंडिया फायनलमध्ये देखील कमाल करेल, अशी अपेक्षा आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या  


SA vs NZ Semi Final : 38 चौकार, 5 षटकार अन् 362 धावा! रचिन रवींद्र - केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेला लईच चोपलं; दुबईचं तिकिट कोणाला मिळणार?


 Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!