IND vs ENG  : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी ओव्हल येथे खेळवला जात आहे. आज कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ प्रकाशाअभावी अर्धा तास अगोदर संपवण्यात आला आहे. भाराताने आज तीन बाद 270 धावा करत 171 धावांची आघाडी केली आहे. कर्णधार विराट कोहलीने 37 बॉलमध्ये चार चौकारासह 22 तर रविंद्र जडेजाने 33 बॉलमध्ये  9 धावा करत नाबाद तंबूत परतले. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन आणि जेम्स एन्डरसनने एक विकेट घेतले. 


तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी कामगिरी चांगली केली. केएल राहुल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. राहुल 101 बॉलमध्ये एक षटकर आणि सहा चौकरासह 46 धावा  करत तंबुत परतला. जेम्स एन्डरसनने राहुलला बाद केले.


त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 153 धावा केल्या. दरम्यान रोहित शर्माने पहिल्यांदा विदेशातील आपले कसोटी शतक पूर्ण केले. रोहितने 204 बॉलमध्ये एक षटकरासह आणि 12 चौकरासह आपले शतक पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितने आठवे शतक पूर्ण केले.


इंग्लंडचा पहिला डाव


इंग्लडने भारताविरूद्धच्या पहिल्या डावात  290  धावा करत  99  धावांची आघाडी घेतली.  इंग्लंडकडून आज  ओली पोपने 159 बॉलमध्ये सहा चौकरासह 81 धावा केल्या. तर ऑलराऊंडर क्रिस वोक्सने 60 बॉलमध्ये 11 चौकरासह 50 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टो ने 37 आणि  मोईन अलीने 35 धावा केल्या. तर भारताकडून उमेश यादवने 76 धावा देत तीन विकेट घेतले. तर जसप्रित बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतले. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरला एका विकेटावर समाधान मानावे लागले.  ओली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला आधार दिला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली.