भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने सिडनी कसोटीत शतक झळकावून तीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक ठोकणारा पहिला भारतीय य़ष्टिरक्षक ठरला आहे.
ऑस्ट्रेलियात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावांचा फारुख इंजिनियर यांचा विक्रमही त्याने मागे टाकला. फारुख इंजिनियर यांनी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना सर्वाधिक 88 धावा केल्या होत्या. इंजिनियर यांचा हा विक्रम पंतने मोडीत काढला आहे.
तसेच पंतने सिडनीत नाबाद 159 धावांची खेळी साकारत भारताबाहेर एका डावात सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक होण्याचा मान मिळवला. त्याने या कामगिरीसह महेंद्रसिंग धोनीचा 147 धावांचा विक्रम मोडीत काढला आहे.
संबधित बातमी : INDvsAUS : पंत 159*, जाडेजा 81 धावा, भारताचा पहिला डाव घोषित