प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने अवघ्या 154 धावांत गुंडाळलं. हे आव्हान भारताचे नवे सलामीवीर शुभमान गिल नाबाद 90 आणि हार्विक देसाईने नाबाद 56 धावा ठोकून, अवघ्या 21.4 षटकात पूर्ण केलं.
या सामन्यात अनुकूल रॉयने 7.1 षटकात अवघ्या 20 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आणि झिम्बाब्वेला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मग आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताने आज नवे सलामीवीर उतरवले. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा हे मागे थांबले. सलामीसीठा शुभमान गिल आणि हार्विक देसाई आले.
हार्विकने 73 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावा केल्या. तर शुभमान गिलने 59 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 90 धावा कुटल्या.
दरम्यान, भारताने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे.
भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेवर 10-10 विकेट्स राखून विजय मिळवला.
संबंधित बातम्या
आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ, कोहली दोन्ही संघाचा कर्णधार
U19 world cup: पीएनजीला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय
पृथ्वी शॉची फलंदाजी पाहून दिग्गजांना सचिन आठवला
146.8 च्या वेगाने गोलंदाजी, अंडर-19 विश्वचषकात नागरकोटीचा विक्रम
16 Jan 2018 11