लंडन : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास सुरु होण्याआधीच एक वाईट बातमी आली आहे. सरावादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जखमी झाला आहे. शनिवारी साऊथेम्प्टन येथे भारतीय संघ सराव करत होता. यावेळी विराटने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा सराव केला. परंतु सरावादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.
5 जून रोजी भारताचा दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. त्याआधीच सरावादरम्यान विराटच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. विराटच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
विराटला दुखापत झाल्यानंतर खूप वेळ तो मैदानात परतलाच नाही. तसेच बराच वेळ विराट टीम इंडियाचे फिजियोथेरेपिस्ट पॅट्रिक फारहार्ट यांच्याकडून ट्रिटमेंट घेत होता. त्यांच्यासोबत या दुखापतीबाबत बोलत होता.
...तर विराट कोहली वर्ल्डकपमधील सामन्यात गोलंदाजी करणार
दुखापत झाली तेव्हा फारहार्ट यांनी विराटच्या अंगठ्यावर पेनकिलर स्प्रे मारला. त्यानंतर विराट खूप वेळ दुखापतग्रस्त अंगठ्याला बर्फाने शेक देत असल्याचे पाहायला मिळाले. मैदानातून बाहेर पडतानादेखील त्याच्या हातात एक बर्फाने भरलेला ग्लास होता.
विराटची ही जखम किती गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु जर ही जखम गंभीर असेल, तर भारतीय संघाच्या चिंता वाढतील. गोलंदाज विजय शंकर नुकताच त्याला झालेल्या दुखापतीतून सावरला आहे. त्यात भारतीय संघाला चिंतेत टाकणारी अजून एक घटना घडली आहे. दरम्यान अष्टपैलू खेळाडू केदार जाधवही त्याच्या दुखापतीतून सावरला आहे.
ICC World Cup 2019 : 'मेन इन ब्लू' विश्वचषकात भगव्या रंगात खेळणार
सरावादरम्यान विराट कोहली जखमी, टीम इंडियाच्या चिंता वाढल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2019 01:45 PM (IST)
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास सुरु होण्याआधीच एक वाईट बातमी आली आहे. सरावादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जखमी झाला आहे.
Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -