धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : मेहदी हसन मिराझची शानदार अष्टपैलू खेळी (3-25 आणि 57 धावा), शकीब अल हसनच्या (3-30) आणि नजमुल शांतोच्या 58 नाबाद खेळीच्या जोरावर धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने अफगाणिस्तानवर (Bangladesh vs Afghanistan) सहा विकेट्स राखून विजय मिळवत वर्ल्डकपमध्ये (ICC Cricket World Cup 2023) शानदार सुरुवात केली. बांगलादेशने वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला अवघ्या 156 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 34.4 षटकामध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले. बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार मेहंदी हसन मिराझ ठरला. त्याने तीन गडी बाद करतानाही शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे बांगलादेशला विजयाच्या समीप गेला. नजमूल शांतोने नाबाद 59 धावांची संयमी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली.
अफगाणिस्तानला (Bangladesh vs Afghanistan) दमदार सलामी मिळूनही मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. 15 षटकात दोन बाद 83 अशी भक्कम मजल मारूनही अफगाणिस्तानचा डाव अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सलामीवीर गुरबाजने केलेल्या 47 खेळी हीच डावातील सर्वोत्तम खेळी ठरली. अन्यथा कुठल्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे ठराविक अंतराने विकेट कोसळत गेल्याने अफगाणिस्तानचा डाव अवघ्या 37.2 षटकात 156 धावांमध्ये आटोपला.
बांगलादेशकडून टचकीन अहमद यांनी एक विकेट घेतली. शरीफुल इस्लामने दोन विकेट घेतल्या. मुस्तफिजूर आणि एक विकेट घेतली. शाकीबने तीन विकेट घेतल्या तर मेहंदी हासन मिराजनेही तीन विकेट घेतल्या. त्यामुळे अफगाणिस्तानचा डाव 156 धावांमध्ये आटोपला. अफगाणिस्तानची मधली फळी पूर्णतः बांगलादेशच्या फिरकी मारल्यासमोर हतबल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अफगाणिस्तानची पाच फलंदाज अवघ्या एकेरी धावसंख्येवर बाद झाले. चांगली सुरुवात मिळून सुद्धा अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
157 धावांचे मापक आव्हान घेऊन उतरलेल्या बांगलादेशची सुरुवातही अतिशय निराशाजनक झाली. सलामीवीर हसन स्वस्तात बाद झाला. लिट्टन दासही लगेच माघारी परतला. त्यामुळे बांगलादेशची अवस्था दोन बाद 27 अशी झाली होती. मात्र तिसऱ्या विकेसाठी मेहदी हसन आणि नजमूल शांतू यांनी 97 धावांची भागीदारी करत बांगलादेशच्या डावाला आकार दिला. त्यामुळे बांगलादेशला विजय प्राप्त करता आला.
संक्षिप्त धावसंख्या : अफगाणिस्तान 37.2 षटकांत सर्वबाद 156 (रहमानुल्ला गुरबाज 47; शकीब अल हसन 3-30, मेहदी हसन मिराझ 3-25) पराभूत विरुद्ध बांगलादेश 34.4 षटकांत 158/4 असा पराभव (नजमुल शांतो 58*, मेहदी हसन मिराझ 57; फारुकी 1-19)
इतर महत्वाच्या बातम्या