विमानातून एक बॅनर बाहेर झळकत होता आणि त्यावर 'जस्टिस फॉर काश्मीर' असे इंग्रजीत लिहिण्यात आले होते. ते विमान कोणाचे होते? त्यात कोण व्यक्ती होत्या? याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु आयसीसी आणि स्थानिक पोलिसांनी ही घटना खूपच गांभीर्याने घेतली आहे.
या घटनेमुळे इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये लोकांची ये-जा वाढल्यामुळे बीसीसीआयने आयसीसीकडे भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज घडलेल्या घटनेनंतर बीसीसीआय आणि आयसीसी भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कोणती पावलं उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान 'जस्टीस फॉर बलुचिस्तान' असे बॅनर लावलेल्या विमानाने स्टेडियमभोवती घिरट्या घातल्या होता. याचा कोणत्याही तपास अद्याप समोर आलेला नाही. उलट याकडे स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि आयसीसीने दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.
व्हिडीओ पाहा