लंडन : इंग्लंडमधल्या आयसीसी विश्वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. यंदाच्या या विश्वचषकात सर्वोत्तम दहा संघ विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे येत्या 46 दिवसांत जगभरातल्या क्रिकेटरसिकांना 48 वन डे सामन्यांची अनोखी मेजवानी मिळणार आहे.

यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये विश्वचषकाचा सलामीचा सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर या सामन्याला सुरुवात होईल.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना आजवर एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. पण यंदाच्या विश्वचषकात इयॉन मॉर्गन आणि फाफ ड्यू प्लेसीच्या फौजा चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ यंदा विजेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरतील.

आला रे आला, वर्ल्ड कप आला...

विश्वचषकाची वैशिष्ट्ये

- या विश्वचषकात कसोटी क्रिकेटची मान्यता लाभलेल्या बारापैकी केवळ दहा संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे आयसीसीच्या सहसदस्य असलेल्या देशांना या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळालेली नाही.

- विश्वचषकातल्या दहाही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला प्राथमिक साखळीत बाकीच्या नऊ संघांशी प्रत्येकी एकदा खेळण्याची संधी मिळेल.

- प्राथमिक साखळीत सर्वोत्तम ठरलेल्या चार संघांना बाद पद्धतीच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आयसीसीच्या नव्या फॉरमॅटनुसार विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठायची, तर दहा फौजांच्या प्राथमिक साखळीत नऊपैकी किमान सहा सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.

ICC World Cup 2019 : 'मेन इन ब्लू' विश्वचषकात भगव्या रंगात खेळणार

भारताच्या साखळी सामन्यांचं वेळापत्रक
आयसीसी विश्वचषकाचं आयोजन येत्या 30 मे ते 14 जुलै या कालावधीत करण्यात येणार आहे. पण टीम इंडियाचा सलामीचा सामना हा पाच जूनला खेळवण्यात येईल. एक नजर वेळापत्रकावर...

- 5 जून : भारत वि दक्षिण आफ्रिका
- 9 जून : भारत वि ऑस्ट्रेलिया
- 13 जून : भारत वि न्यूझीलंड
- 16 जून : भारत वि पाकिस्तान
- 22 जून : भारत वि अफगाणिस्तान
- 27 जून : भारत वि वेस्ट इंडिज
- 30 जून : भारत वि इंग्लंड
- 2 जुलै : भारत वि बांगलादेश
- 7 जुलै : भारत वि श्रीलंका

उपांत्य आणि अंतिम सामना
इंग्लंडमधील विश्वचषकाचे दोन उपांत्य सामने अनुक्रमे 9 आणि 11 जुलैला, अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल.

विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकावर भारताचं नाव कोरणार?

भारतीयांच्या सोयीनुसार वेळापत्रक
विश्वचषकाचं यजमानपद इंग्लंडला मिळालं असलं तरी त्याच्या वेळापत्रकाची आखणी भारताला केंद्रबिंदू मानून करण्यात आली आहे. टीम इंडियाचे सर्व साखळी आणि बाद फेरीचे सामने हे भारतीयांना सोयीस्कर वेळेत म्हणजे दुपारी तीन ते रात्री साडेदहा या वेळेत खेळवण्यात येतील. त्यामुळे यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या दिवाळीत कोणता संघ फटाके फोडणार याची क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

विश्वचषकाचं संपूर्ण वेळापत्रक

30 मे - इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका
31 मे - वेस्ट इंडिज वि पाकिस्तान
1 जून - न्यूझीलंड वि श्रीलंका
1 जून - अफगाणिस्तान वि ऑस्ट्रेलिया
2 जून- दक्षिण आफ्रिका वि बांगलादेश
3 जून - इंग्लंड वि पाकिस्तान
4 जून - अफगाणिस्तान वि श्रीलंका
5 जून - दक्षिण आफ्रिका वि भारत
5 जून - बांगलादेश वि न्यूझीलंड
6 जून - ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडिज
7 जून - पाकिस्तान वि श्रीलंका
8 जून - इंग्लंड वि बांगलादेश
8 जून - अफगाणिस्तान वि न्यूझीलंड
9 जून - भारत वि ऑस्ट्रेलिया
10 जून - दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडिज
11 जून - बांगलादेश वि श्रीलंका
12 जून - ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान
13 जून - भारत वि न्यूझीलंड
14 जून - इंग्लंड वि वेस्ट इंडिज
15 जून - श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया
15 जून - दक्षिण आफ्रिका वि अफगाणिस्तान
16 जून - भारत वि पाकिस्तान
17 जून - वेस्ट इंडिज वि बांगलादेश
18 जून - इंग्लंड वि अफगाणिस्तान
19 जून - न्यूझीलंड वि दक्षिण आफ्रिका
20 जून - ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश
21 जून - इंग्लंड वि श्रीलंका
22 जून - वेस्ट इंडिज वि न्यूझीलंड
22 जून - भारत वि अफगाणिस्तान
23 जून - पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका
24 जून - बांगलादेश वि अफगाणिस्तान
25 जून - इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया
26 जून - न्यूझीलंड वि पाकिस्तान
27 जून- भारत वि विंडिज
28 जून - श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका
29 जून - न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया
29 जून - पाकिस्तान वि अफगाणिस्तान
30 जून - इंग्लंड वि भारत
1 जुलै - श्रीलंका वि वेस्ट इंडिज
2 जुलै - बांगलादेश वि भारत
3 जुलै - इंग्लंड वि न्यूझीलंड
4 जुलै - अफगाणिस्तान वि वेस्ट इंडिज
5 जुलै - पाकिस्तान वि बांगलादेश
6 जुलै - श्रीलंका वि भारत
6 जुलै - ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका
9 जुलै - पहिला उपांत्य सामना
11 जुलै - दुसरा उपांत्य सामना
14 जुलै- अंतिम सामना