मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कालच (सोमवारी) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये सुरु असलेल्या मतभेदामुळे टीम इंडियांची निवड तब्बल 13 दिवस उशिरानं झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी असणार आहे.


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं आहे. 1 जून पासून या मालिकेत सामने सुरु होणार आहेत. पहिला सामना इंग्लंड आणि बांग्लादेशमध्ये होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 4 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

या मालिकेसाठी दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड

ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- 2017च्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

जून 1:  इंग्लंड Vs बांगलादेश

जून 2:  ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड

जून 3:  श्रीलंका Vs दक्षिण अफ्रिका

जून 4:  भारत Vs पाकिस्तान

जून 5:  ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश

जून 6:  न्यूझीलंड Vs इंग्लंड

जून 7:  पाकिस्तान Vs दक्षिण अफ्रिका

जून 8:  भारत Vs श्रीलंका

जून 9:  न्यूझीलंड Vs बांगलादेश

जून 10:  इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया

जून 11:  भारत Vs दक्षिण अफ्रिका  

जून 12:  श्रीलंका Vs पाकिस्तान

जून 14:  पहिली सेमीफाइनल (A1 Vs B2)

जून 15:  दूसरी सेमीफाइनल (A2 Vs B1)

जून 18:  अंतिम सामना