विराट कोहलीचा दहा हजार धावांपर्यंतचा प्रवास
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई | 24 Oct 2018 09:25 PM (IST)
विराट हा वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जलद दहा हजार धावा ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.
मुंबई : विराट कोहलीची धावांची भूक काही भागताना दिसत नाही. टीम इंडियाच्या कर्णधाराने गुवाहाटीपाठोपाठ विशाखापट्टणमच्या वन डेतही विंडीज गोलंदाजांना बुकललं आणि वन डे कारकीर्दीतलं 37 वं शतक साजरं केलं. याच खेळीदरम्यान विराट कोहली हा वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जलद दहा हजार धावा ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. कोहलीने नव्या विश्वविक्रमासह हा इतिहास घडवला. एक हजार धावा- 24 डाव वि. श्रीलंका, हरारे वन डे, 5 जून 2010 दोन हजार धावा – 53 डाव वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन वन डे, 8 जून 2011 तीन हजार धावा – 75 डाव वि. श्रीलंका, अडलेड वन डे, 14 फेब्रुवारी 2012 चार हजार धावा – 93 डाव वि. इंग्लंड, रांची वन डे, 19 जानेवारी 2013 पाच हजार धावा – 114 डाव वि. वेस्ट इंडिज, कोची वन डे, 21 नोव्हेंबर 2013 सहा हजार धावा – 136 डाव वि. श्रीलंका, हैदराबाद वन डे, 9 नोव्हेंबर 2014 सात हजार धावा – 161 डाव वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न वन डे, 17 जानेवारी 2016 आठ हजार धावा – 175 डाव वि. बांगलादेश, बर्मिंगहॅम वन डे, 15 जून 2017 नऊ हजार धावा – 194 डाव वि. न्यूझीलंड, कानपूर वन डे, 29 ऑक्टोबर, 2017 दहा हजार धावा – 205 डाव वि. वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम वन डे, 24 ऑक्टो. 18