Yuvraj Singh on Abhishek Sharma: अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकावले. भारतीय सलामीवीर म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. अभिषेकने 20 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या, ज्यामध्ये 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्या ६८ धावांच्या संपूर्ण खेळीत त्याने एकही 'डॉट बॉल' (धाव न घेता गेलेला चेंडू) खेळला नाही. अभिषेकने 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत 9 वेळा अर्धशतके झळकावून सूर्यकुमार यादवचा विक्रम मागे टाकला. तसेच, तो सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत के.एल. राहुलला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
युवराजचा विक्रम मोडणे कोणासाठीही अशक्य
मात्र,अभिषेक शर्मा त्याचा मार्गदर्शक (Mentor) युवराज सिंगचा 12 चेंडूंतील अर्धशतकाचा जागतिक विक्रम मोडण्यापासून केवळ 2 चेंडू दूर राहिला. यावर युवराजने सोशल मीडियावरून मिश्किलपणे त्याला डिवचले की, "अजूनही 12 चेंडूत 50 धावा करू शकत नाहीस का? अभिषेकनेही याला नम्रपणे उत्तर देताना म्हटले की, युवराजचा विक्रम मोडणे कोणासाठीही अशक्य आहे, पण प्रयत्न करणे रंजक ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली.
5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
भारताने न्यूझीलंडचे 154 धावांचे लक्ष्य केवळ 10 षटकांत 2 बाद 155 धावा करून पूर्ण केले आणि 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. मायदेशात सलग 11 वी टी-20 मालिका जिंकण्याचा जागतिक विक्रम भारताने प्रस्थापित केला आहे. दुसरीकडे अभिषेकला साथ देताना कॅप्टन सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या. पुढील सामना (चौथा टी-20) बुधवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
