नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. मात्र या निवडीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंह याचंही एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


करुण नायर कुठे आहे, त्याने इंग्लंडविरुद्ध 300 धावा केल्या आहेत आणि त्याची साधी सराव सामन्यासाठीही निवड करण्यात आली नाही, काय कमाल आहे, असं हरभजनच्या व्हायरल ट्वीटमध्ये लिहिलेलं आहे.

कोहली कर्णधार, युवीचं कमबॅक, टीम इंडियाची घोषणा


 

हरभजनकडून हे ट्वीट नंतर डिलीट करण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र निवड समितीवर सवाल उपस्थित केला जात असल्याचं यानिमित्ताने उघड झालं आहे.



इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अनेक खेळाडूंचं अनेक दिवसानंतर पनरागमन झालं आहे. युवराज सिंहचं जवळपास तीन वर्षांनी वन डेमध्ये पुनरागमन झालं आहे. तर सुरेश रैना, शिखर धवन, आशिष नेहरा आणि यजुवेंद्र चाहल यांनाही संधी मिळाली आहे. शिवाय टी ट्वेंटीसाठी रिषभ पंत या युवा खेळाडूचाही संघात समावेश आहे.

वन डे भारतीय संघ : विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), के एल राहुल,  शिखर धवन, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव

टी-ट्वेण्टी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मनदीप सिंह, के एल राहुल, युवराज सिंह, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, मनिष पांडे, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा

संबंधित बातम्या


BCCI चा तांत्रिक घोळ, टीम इंडिया अडकली!


धोनीला कर्णधार बनवणारा मराठमोळा माणूस!


धोनीनं निवृत्ती घेतली असती तर मी धरणं धरलं असतं: गावसकर


कोहलीच्या नेतृत्त्वात धोनी कोणत्या क्रमांकावर खेळणार?


रणजी: पृथ्वी शॉचं शतक, मुंबई फायनलमध्ये


धोनीला कर्णधार बनवणारा मराठमोळा माणूस!


कर्णधारपद सोडण्यामागचा ‘कूल धोनी’चा मास्टर प्लान!


धोनीचे 6 चलाख निर्णय, ज्याला तुम्हीही सॅल्युट कराल!


धोनीचा राजीनामा, सगळे बोलले, पण सेहवाग गप्प का?


वन डे, टी20 च्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार


महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर


धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची पाच कारणं