Glenn Phillips Viral Video: न्यूझीलंडचा धडाकेबाज क्रिकेटर ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. त्याला कारण ठरला आहे तो त्याचा एक नवाकोरा व्हिडिओ. मैदानात आपल्या 'पॉवर-हिटर' इमेज आणि जबरदस्त फील्डिंगने सर्वांना थक्क करणाऱ्या फिलिप्सने आता आकाशात भरारी घेतली आहे. ऑकलंडच्या आकाशात स्वतः विमान उडवतानाचा त्याचा एक व्हिडिओ (Glenn Phillips Flying Aircraft Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहते त्याच्या अष्टपैलू प्रतिभेला पाहून पुन्हा एकदा अवाक झाले आहेत.

Continues below advertisement

विमान उडवण्याचे स्वप्न केलं पूर्ण

मिळालेल्या माहितीनुसार, ग्लेन फिलिप्स गेल्या काही काळापासून खासगी विमानाचे पायलट होण्याचे प्रशिक्षण (Flying Lesson) घेत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये फिलिप्स मोठ्या आत्मविश्वासाने आणि आनंदाने विमान चालवताना दिसत आहे. केवळ विमान उडवणेच नाही, तर त्याने विमानाचे लँडिंग (Flying and Landing) देखील अत्यंत सफाईदारपणे केले. क्रिकेटच्या मैदानावर ज्याप्रमाणे तो दबावाखाली चांगली कामगिरी करतो, तशीच शांतता त्याने विमानाचा कंट्रोल सांभाळताना दाखवली. 

एक 'मल्टी-टॅलेंटेड' खेळाडू: क्रिकेटपासून ते पॉवरलिफ्टिंगपर्यंत

फिलिप्सचा हा नवा छंद आणि कौशल्य पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याला 'सुपरमॅन' अशी उपमा दिली आहे. ग्लेन फिलिप्स हा एक अत्यंत गुणवान आणि अष्टपैलू खेळाडू आहे, हे त्याने अनेकदा सिद्ध केले आहे.  

फिलिप्स त्याची आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तो एक जबरदस्त फिनिशर आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट फील्डर (Amazing Fielder)

अनेक क्रिकेट पंडित आणि चाहते त्याला सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्कृष्ट फील्डर (Best Fielder in the World) मानतात. त्याच्या कॅचेस आणि डायव्ह्स पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

यष्टिरक्षक (Wicket Keeping)

केवळ फील्डिंगच नाही, तर तो उत्तम यष्टिरक्षण देखील करू शकतो, ज्यामुळे तो संघाला एक अतिरिक्त पर्याय देतो.

ऑफ-स्पिनर (Fifer with Ball)

तो एक उपयुक्त ऑफ-स्पिन गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पाच विकेट्स घेण्याचा कारनामा देखील केला आहे.

पॉवरलिफ्टर (Powerlifting)

केवळ मैदानातच नाही, तर जीममध्येही त्याचा जलवा आहे. फिलिप्स आश्चर्यकारकरित्या 408 पाउंड्स (सुमारे 185 किलो) वजन बेंच प्रेस (Bench Press) करू शकतो.

जलतरणपटू (Great Swimmer): तो एक उत्कृष्ट पोहणारा देखील आहे, जे त्याच्या फिटनेसबद्दल बरेच काही सांगते.

चाहते झाले फिदा

फिलिप्सच्या विमान उडवतानाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, "तो फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो, विकेट कीपिंग करतो, जगातील सर्वोत्तम फील्डर आहे, 400 पाउंड वजन उचलतो आणि आता विमानही उडवतो? हा माणूस नक्की काय करू शकत नाही?  त्याच्या या नवीन कौशल्याबद्दल क्रिकेट जगताकडूनही त्याचे कौतुक होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या