Australia vs West Indies, 2nd T20I : ॲडिलेडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे वादळ पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅक्सवेलने (Glenn Maxwell) अवघ्या 55 चेंडूत 120 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 8 षटकारांची  बरसात केली. ग्लेन मॅक्सवेलचे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील हे पाचवे शतक आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मासह ग्लेन मॅक्सवेल प्रथम स्थानावर पोहोचला आहे. ग्लेन मॅक्सवेल व्यतिरिक्त रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 5 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.






वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 242 धावांचे लक्ष्य असताना त्यांना 20 षटकात 9 बाद 207 धावापर्यंत मजल मारता आली. कॅप्टन रोवमॅन पाॅवेलने 36 चेंडूत 63 धावांची खेळी  करत संघर्ष केला, पण ठराविक अंतराने विकेट गमावल्याने पराभव  पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून मार्क स्टाॅयनिसने तीन विकेट घेतल्या, हेझलवुड आणि स्पेन्सर जाॅन्सनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अॅडम झम्पा आणि जेसोन बेहरनडाॅर्फने एक विकेट घेतली. 






या फलंदाजांचे T20 फॉरमॅटवर वर्चस्व


रोहित शर्माने 143 सामन्यात 5 शतके झळकावली आहेत. पण ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या 94 सामन्यात 5 शतके ठोकण्याचा पराक्रम केला. याशिवाय टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवच्या नावावर 57 टी-20 सामन्यांमध्ये 4 शतके आहेत.






ॲडलेडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 241 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने शतक झळकावले, पण याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि टीम डेव्हिडसारख्या फलंदाजांनी छोटे पण उपयुक्त योगदान दिले.






इतर महत्वाच्या बातम्या